महाराष्ट्र

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9921500780

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येईल चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूर मार्गे दुपारी १.३० वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे आज ३० मे रोजी दुपारी २ वाजेपासून ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ३१ मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण येणार आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button