“अहम” या मराठी चित्रपटात वडार समाजाची बदनामीकारक व गुन्हेगारी प्रवृत्तीची वस्तुस्थिती दाखवल्याने समाजाच्या भावना दुखावल्याने चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही— विजय पवार, सातारा

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
“अहम” या मराठी चित्रपटात वडार समाजाबाबत चुकीची व बदनामीकारक वस्तुस्थिती दाखवली असून या चित्रीकरणाचा भाग चित्रपटातून वागळावे आणि वडार समाजाची होणारी बदनामी विकृतीकरण थांबवावी अन्यथा 12 मे 2023 रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही
याप्रसंगी होणाऱ्या परिणामास सर्वश्री प्रशासन व चित्रपट निर्माते जबाबदार राहतील असा इशारा “मी वडार महाराष्ट्राचा” या संघटनेचे सातारा विभागीय जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी उपविभागीय अधिकारी कराड जिल्हा सातारा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वडार समाजातील बांधव हे गडकोट किल्ले रस्ते निर्माण करणारा समाज आहे आणि अहम चित्रपटात वडार समाज बांधवांची खलनायक म्हणून चित्रित केलेला भाग वडार समाजातील व्यक्ती हा अन्याय करणारा दाखवल्या असल्याने तो भाग समाजाची बदनामी विकृतीकरण या चित्रपटात दाखविण्यात आलेला भाग वगळण्यात यावा

तसेच विजय पवार यांनी “अहम “चित्रपटाचे सहाय्यक निर्माते व नायक अमीर शेख यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधला असता अमीर शेख यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन “तू कोण तुला काय करायचे ते कर “असे बोलले त्यानंतर विजय पवार यांनी मी वडार समाजाचा सातारा विभागीय जिल्हाध्यक्ष आहे असे सांगितले असताना सुद्धा त्यांनी मला वेगळी भाषा वापरली त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत
सदर चित्रीकरणांमध्ये वडार बोली भाषेचा वापर करून समाजाची व्यक्तिरेखा खलनायकाची दाखवली आहे त्यामुळे समाजाला सन्मानाने जगण्याचा हक्क दावल ला जात आहे त्यामुळे समाजामध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शक व नायक यांच्या विषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे मुळातच आमच्या समाजाकडे स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतीसाठी केलेल्या कार्याला गुन्हेगार म्हणून पाहिले जात होते म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या समाजाला इंग्रज सरकारने गुन्हेगार म्हणून घोषित केले होते

मात्र स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समाजावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसून काढला व आम्हाला त्यातून मुक्त करून मुख्य प्रवाहात सहभागी करून घेतले सध्या अहम” चित्रपटांमध्ये स्वातंत्र्यपूर्वीच्या इंग्रज सरकार प्रमाणे समाजाला गुन्हेगार दाखवून आमच्या समाजावर अन्यायकारक चित्रपट निर्माण केला आहे तरी या आमचे चित्रपटातील समाज बांधवावर चित्रित केलेला संपूर्ण भाग वगळण्यात यावा सदर हा भाग चित्रपटातून कमी केला नाही तर हा चित्रपट महाराष्ट्रात कोठेही प्रदर्शित केला जाऊ नये किंवा चित्रपट निर्मात्याला बोलावून याबाबत प्रशासनाने शहानिशा करून संपूर्ण चित्रपटाची माहिती देण्यास भाग पाडावे
अन्यथा या समाजातील भावना दुखावल्या जाऊन काही अनर्थ घडू नये याची दक्षता घ्यावी अशी विनंती निवेदनात केली आहे तरी वडार समाजातील लोकांनी स्वतःच्या काबाडकष्टाने मोलमजुरी करून एकीच्या बळावर समाजामध्ये प्रतिष्ठा मान निर्माण केली आहे या चित्रपटातील बदनामीकारक चित्रीकरणामुळे वडार समाजातील प्रतिष्ठा मलिन होणार असेल तर समाजाला लोकशाही मार्गाने निषेधात्मक आंदोलन छेडावे लागेल असाही इशारा निवेदनात,दिला आहे



