महाराष्ट्र

श्रीनाथ देवस्थान ट्रस्टमधील अतिक्रमण काढा -नवनाथ रणदिवे

दिघंची येथील श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट नंबर ए ७१० दिघंची (ता. आटपाडी) या न्यासाचे मिळकतीवरील बेकायदेशीर बांधकामे त्वरित काढावीत व तसे आदेश तहसीलदारांना द्यावेत, अन्यथा १५ तारखेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नवनाथ रणदिवे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

निवेदनामध्ये नमूद केले आहे की, यापूर्वी न्यासाचे भक्त म्हणून योग्य त्या अधिकारानुसार कागदोपत्री पाठपुरावा केलेला आहे. वरील नमूद न्यासाचे विश्वस्त म्हणून तहसीलदार, मंडलाधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह अन्य दोघांची नेमणूक २०१६ रोजी सह धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांनी केलेली आहे.

त्या वेळी न्यासाच्या मिळकतीचे व्यवस्थापन पाहण्याचे आदेश सहा वर्षांपूर्वी झालेले आहेत. परंतु वरील विषयाने वरील नमूद न्यासाचा मिळकतीवरील बेकायदा बांधकाम व खरेदी व्यवहार होऊ नये व झालेले काढून घेण्याविषयी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे न्यासाच्या मिळकतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्यास केवळ तहसीलदार, मंडलाधिकारी, ग्रामसेवक व अन्य दोघे जबाबदार आहेत. मिळकतीवरील बांधकामे तातडीने काढून घेण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात यावेत.अन्यथा १५ तारखेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा निवेदनात दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button