महाराष्ट्र

भोरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर चेअरमनपदी आनंदा आंबवले तर व्हाईस चेअरमनपदी ईश्वर पांगारे

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल

भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी आनंदा बाबुराव आंबवले तर व्हॉइस चेअरमनपदी ईश्वर बबन पांगारे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड झाल्यानंतर भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भोर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपट सुके, मा.जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीनाना कोंडे, अशोक आबा शेलार, अरविंद सोंडकर, भोर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक विठ्ठल खोपडे यांच्यासह भोर तालुका बाजार समितीचे संचालक अंकुश पांडुरंग खंडाळे, राजाराम बाबुराव तुपे, भाऊ चंदर मळेकर, सुरेश वाघू राजीवडे, धनंजय कृष्णा वाडकर, निलेश बबन सोनवणे, विठ्ठल धोंडीबा गोरे, महेश अशोक धाडवे, प्रवीण विष्णु शिंदे, शहाजी दिलीप बोरगे, सुरेखा रमेश कोंडे, अनिता दत्तात्रय गावडे, नवनाथ विठ्ठल भिलारे, राजेंद्र दिनकर शेटे, दिपक दिनकर गायकवाड, विनोद गुलाब खुटवड, वेळूचे मा.सरपंच ज्ञानेश्वर पांगारे, मारुती गुजर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button