न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर विद्यार्थ्यांचा तब्बल २३ वर्षांनी भरला १० वीचा वर्ग

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल
मित्र मैत्रिणींच्या आणि शिक्षकांच्या सहवासात न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर विद्यालयाच्या २००० च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. तब्बल 23 वर्षानंतर पुन्हा एकदा या विद्यालयात हा वर्ग भरला होता. या बॅचच्या स्नेह मेळाव्याचे दिवसभर या विद्यालयात येऊन या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिक्षक नवले सर, भेलके सर, वीर सर, कामठे सर, गुजर सर, खुटवड मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य जगताप सर, शिपाई मारुती सुतार आदी शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षकांना हॉट टिफीन, शाळेला गॅस सिलेंडरचा एक सेट तसेच विदयार्थी व विद्यार्थिनींना पेनची भेटवस्तु देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल शेलार यांनी तर आभार प्रदीप (आबा) बांदल यांनी मानले. विनोद नेवसे, परशुराम बांदल, किरण हिरगुडे, अभिजीत गोळे, श्रीधर बांदल, सचिन जगदाळे, संतोष शेडगे, अमोल काळे आदींनी संयोजन केले. कार्यक्रमासाठी ६० विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. २३ वर्षांनी शाळा सोडून गेलेले बालमित्र पुन्हा एकदा शाळेत येऊन सुखावली होती. वर्गमित्र व मैत्रिणींना भेटल्याचे समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावेळी शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले.



