महाराष्ट्र
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः च्या कुटुंबाचे हित न पाहता शेवटच्या श्वासापर्यंत अन्यायग्रस्त समाजाचे हित पाहिले : प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांचे कृ त ज्ञ उद्गार

ज्येष्ठ -पञकार,—प्रा.विश्वनाथ पाटील ,कोडोली-कोल्हापूर
कोडोली, ता. 15: ” जेव्हा जेव्हा समाजात अनागोंदी माजते त्यावेळी अलौकिक सत्पुरुष जन्म घेत असतात. राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्याप्रमाणेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील समाजाच्या उन्नतीसाठी च जन्मले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः च्या कुटुंबाचा स्वार्थ न पाहता पीडितांना च आपले कुटुंब मानले. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी पीडितां साठी कार्य केले, ” असे कृ त ज्ञ ता पू र्व क गौरवोद्गार प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी काढले.
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने डॉ. पाटील बोलत होते.
प्रशिक्षणार्थी प्रदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणार्थी मेघा दा ईं ग डे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. डी. डी. पाटील, प्रा. अजित लो क रे, प्रा. सदाशिव र क्ता डे, कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील, वरीष्ठ लिपिक अनिल इंदुलकर, तानाजी मोहिते यांच्यासह विद्यार्थी - शिक्षक या सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.



