शहर

दलीत युवकावर झालेल्या निषेधार्थ धरणे आंदोलनास यश –युवासेनेच्या वतीने मानले पोलिस प्रशासनाचे आभार

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

माळीनगर गट नंबर २ , ता.माळसिरस येथील सनी कांबळे या युवकावर पुर्व वैमनस्यातुन भरचौकात दिवसाढवळ्या दगडाने ठेचण्याचा प्रकार झाला असुन त्या युवकाचे या हल्ल्यात दोन्ही फ्रॉकचर झाले आहेत.अकलूज पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून त्यांना अटक केली व ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला याबद्दल युवासेना अकलूज शहरप्रमुख शेखर भैय्या खिलारे यांनी अकलूज पोलिसांचे आभार मानले.

परंतु सध्या माळशिरस तालुक्यात दलितांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे तसेच कांबळे परिवाराला संरक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करावे या मागण्यायांसाठी व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवार दिं – १०/०४/२०२३ रोजी सकाळी ११ वा.विविध सामाजिक संघटनांच्या वतीने प्रांतकार्यालयासमोर शेखरभैय्या खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.त्यावेळी साजिदभाई सय्यद ( सोलापूर जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग ), शिवसेना तालुका संघटक वीरेंद्र वाघमारे,भारतीय दलित महासंघाचे दादासाहेब लोखंडे,वंचित बहुजन आघाडीचे विजयभाऊ कोकणे ,दत्ताभाऊसाळुंखे(उप.तालुकाप्रमुख युवासेना),शिवसैनिक मिलिंद मोरे,मैत्री प्रतिष्ठानचे महेश शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष अविनाश सोनवणे,चिंतामणी गायकवाड,विजय धाईंजे,अंकुश धाईंजे, करणभाऊ कांबळे,शिवराम गायकवाड,बच्चन साठे,गणेश भिताडे,शिवदात्त नामदास,जावेद शेख व पिडीत युवकाचा पूर्ण परिवार या आंदोलनात सामील होता सदरचे निवेदन नायब तहसीलदार देसाई मॅडम यांनी स्वीकारले.विविध सामाजिक संघटनांच्या वतीने झालेले हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी शेखर खिलारे यांनी प्रयत्न केले. व दादासाहेब लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button