शहर

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकाची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आज वाडी, बामणी, धारूर, गावाच्या परिसरातील नुकसानीची पाहणी शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केली.

अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस, ड्रगनफ्रुट आणि फळबागांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक हातून हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अवकाळी पाऊस व गारपीटिने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता असून त्यासाठी खासदार ओम राजे निंबाळकर यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत

या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे, अण्णा तनमोर, दिनेश बंडगर, शिवसेना विभागप्रमुख प्रवीण पानथरे, युवा कार्यकर्ते समाधान माने, शिवसेना गणप्रमुख नेताजी पाटील, सचिन लांडे, रवी हरवले, कंचेश्वर डोंगरे, गोवर्धन पानथरे, नानासाहेब चव्हाण, सरपंच, उपसरपंच, तलाठी, मंडळ अधिकार, कृषि अधिकारी, ग्रामसेवक, प्रशासकीय अधिकारी, शेतकरी बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button