जागतिक होमिओपॅथी दिवस :सर्जिकल होमिओपॅथी : होमिओपॅथी जागतिक योगदान सिद्ध करून मानव, प्राण्यांना ठरली वरदान. २२६ वर्षात होमिओपॅथी ने दिले करोडो लोकांना तसेच पशू पक्ष्यांना जीवदान.
टाइम्स 9 मराठी न्यूज
होमिओपॅथीचा इतिहास :
होमिओपॅथीचे जनक डॉ. ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्म १० एप्रिल १७५५ रोजी जर्मनी मध्ये झाला. सन १७७९ मध्ये ते आधुनिक वैद्यकीय चिकित्सा मध्ये ते पदवीधर एम. डी. डॉक्टर झाले. त्यानंतर त्यांनी आपला वैद्यकिय व्यवसाय सुरू केला. मात्र त्यावेळी प्रचलित उपचार पद्धतीमुळे अनेकदा रुग्णांना मृत्यू येत होता. त्यामुळे त्यांनी आपला व्यवसाय बंद करून वैद्यकिय पुस्तकांचे जर्मन भाषेत भाषांतर सुरू केले. सन १७९० मध्ये कुलेन मटेरिया मेडिकाचे भाषांतर करत असताना त्यांना सिंकोना बार्क या वनस्पती मध्ये ताप निवारण करण्याची ताकद असल्याचे समजले. ही वनस्पती ताप बरा करत असेल तर निरोगी माणसामध्ये ती ताप सदृश्य लक्षणे तयार करते असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी हा प्रयोग स्वतःसह मित्र परिवार यांच्यावर केला. या सुवर्ण प्रयोगाची त्यांनी १७९६ मध्ये घोषणा करून जगास होमिओपॅथीची देणगी दिली. संपूर्ण जगात जनाश्रय लाभलेल्या या चिकित्सा पद्धतीने जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
भारतात होमिओपॅथी :
सन १८१० मध्ये जर्मन डॉक्टर तसेच लंडन मिशनरी सोसायटीचे डॉ. मुल्लेंस यांनी ही पद्धत भारतात कोलकता येथे सुरू केली. डॉ. जॉन मार्टिन हनिंगबर्गर यांनी सन १८३९ मध्ये ही पद्धत भारतात आणली. पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांच्यावर त्यांनी औषधोपचार केले. त्यांना कॉलरा डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. सन १८४६ मध्ये सर्जन सम्युएल
ब्रुकिंग यांनी दक्षिण भारतात तंजावर आणि पदुकुटा येथे होमिओपॅथिक हॉस्पिटल सुरू केले. सन १८६१ ते १८६३ मध्ये बाबू राजन दत्ता यांनी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर तसेच राधाकांत देव बहादुर यांना बरे करून होमिओपॅथी लोकप्रिय केली. त्यानंतर डॉ. महेंद्र लाल सरकार, डॉ. बी. एल बहादुरी, डॉ. पी. सी. मुजुमदार, डॉ. बॅनर्जी यांनी या चिकित्सा पद्धतीचे शास्त्रोक्त महत्त्व लोकांना पटवून दिले.
महाराष्ट्रात होमिओपॅथी :
महाराष्ट्र शासनाने देखील होमिओपॅथीची दोन मूलभूत पुस्तके प्रसिद्ध करून याची ओळख जनतेस करून दिली. डॉ. ढवळे, डॉ. दफ्तरी, डॉ. पळसुले, डॉ. पाठक यांनी देखील होमिओपॅथीच्या प्रचारासाठी योगदान दिले आहे.
होमिओपॅथिक औषधे ही वनस्पती, खनिजे, प्राणी उत्पादने यांसारख्या नैसर्गिक संसाधनांपासून बनवली जातात. अनेकजण या शास्त्रास चिकित्सा पद्धत न मानता प्लेसिबो इफेक्ट मानतात. मात्र ज्यावेळी त्यांच्या घरी आजारपण येते, त्यावेळी ते सुरक्षित औषध म्हणून होमिओपॅथीस प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. कारण ही उपचार पद्धती रोग प्रतिकारक शक्ती अबाधित ठेवण्यावर भर देते. त्यामुळे ही उपचार पद्धत लोकप्रिय झाली आहे. या चिकित्सा पद्धतीने विविध जीवन शैलीचे आजार, व्हायरल व बॅक्ट्रेरियल आजार यावर आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
ही औषधे विविध शस्त्रक्रिया टाळण्या साठी, शस्त्रक्रियेच्या जखमा बऱ्या करण्या साठी तसेच वेदना निवारक म्हणून स्पायनल हेडेक बरी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. शस्त्र क्रिये पूर्वी ही औषधे दिल्यास ऑपरेशन ची देखील भीती कमी होते. ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया अत्यावश्यक आहेत, त्या केल्याच पाहिजेत, मात्र जिथे इमर्जन्सी नाही, तिथे सेकंड ओपिनियन म्हणून होमिओपॅथीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.
मान्यवर : राष्ट्रपिता महात्मा गांधी, जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार, सायरा बानू, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे सुध्दा होमिओपॅथीचे औषध घेतात. मी स्वतः इंदापूर येथे श्री राम रथ यात्रा आल्यानंतर जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, प्रसिद्ध रंग भूमी कलाकार प्रशांत दामले तसेच अनेक मान्यवरांना होमिओपॅथिक औषधे यशस्वी पद्धतीने वापरली आहे.
सर्जिकल होमिओपॅथी : मी माझे जेष्ठ बंधू जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सर्जिकल आजार असलेले हजारो रुग्ण बरे केले आहेत. हा योगा योग नसून यामागे मोठी साधना आहे.मुतखड्याचे हजारो रुग्ण बरे झाले असून पुन्हा मुतखडे होण्याचे प्रमाण अत्यल्प आहेत. किडनी मध्ये तळात असलेला अगदी ५१ एमएम चा मुतखडा देखील तुकडे तुकडे होवून गेला आहे. मूत्रवाहिनी, किडनीच्या वरच्या व मधल्या भागातील मुतखडे लवकर जातात तर किडनी मध्ये तळात असलेले मोठे खडे जाण्यास वेळ लागतो.
पित्ताशयातील खडे, मूळव्याध, भगिंदर, कंबरेच्या मणक्यातील दोष, गुडघेदुखी, नाकात हाड किंवा मांसल भाग वाढणे, कुरुपे, चामखीळ, शरीरावरील तसेच शरीरातील विविध प्रकारच्या गाठी, फॉरेन बॉडी, थायरॉईड ग्रंथीच्या गाठी, अपेंडिक्स, महिलांमध्ये पिशवी तसेच स्त्री बिजांडाच्या गाठी आदी ४० प्रकारच्या विविध शस्त्रक्रिया रुग्णांची लक्षणे जुळल्यास होमिओपॅथीमुळे निश्चित टळू शकतात हा आमचा अनुभव आहे. मात्र त्यासाठी रुग्णांनी गुगल डॉक्टरवर अवलंबून न रहाता प्रत्यक्ष तपासणी करणाऱ्याहोमिओपॅथिक डॉक्टरला व्यवस्थित माहिती देणे गरजेचे आहे. होमिओपॅथीक औषधांसोबत कच्चा कांदा, लसूण, कॉफी तंबाखू, गुटखा न खाल्यास आणखी लवकर गुण येवू शकतो.
होमिओपॅथिक औषधी गर्भवती महिला तसेच लहान बाळांना देखील उपयुक्त आहेत मात्र त्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेणे गरजेचे आहे.
ॲक्युट डिसीजेस असणाऱ्या सर्दी, थंडी ताप, खोकला, डेंग्यू, टायफाईड, मलेरिया आदी आजारांवर होमिओपॅथीक औषधांचा लगेच गुण येतो. या आजारात दिली जाणारी औषधे शरीरा तील रोग प्रतिकारशक्ती वाढवून आजार बरे करतात.
सध्याच्या जगात चिंतेचा विषय असणाऱ्या व्हायरल कोविड १९ वर सुद्धा होमिओपॅथी प्रभावी व गुणकारी ठरली आहे. कोरोना महामारीत २२०० रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड मिळाली नाही, त्यांचा स्कोअर १० पासून २० पर्यंत होता. अश्या रुग्णांना घरच्या घरी बरे करण्यात आम्हाला यश आले. त्याचे श्रेय डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या होमिओपॅथीस जाते. त्यामुळे डॉ. सॅम्युअल हॅनेमन हे देवमाणूस म्हणून मान्यता प्राप्त आहेत.
पशुधन संवर्धन :
पशुधनाच्या स्तनावरील चामखिळा, गाठी, लंपी आदी आजारा बरोबरच दूध वाढी साठी देखील होमिओपॅथिक औषधे उपयुक्त आहेत. त्यामुळे आपल्या कृषी प्रधान देशात पशूधनाचे आरोग्य जपण्यासाठी तालुका निहाय होमिओपॅथिक हॉस्पिटल होणे गरजेचे आहे.
होमिओपॅथीस शंभर टक्के राजाश्रय हवा :
आपल्या देशात आधुनिक चिकित्सा पद्धत तसेच प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीस राजाश्रय आहे तर होमिओपॅथीस थोड्या प्रमाणात राजाश्रय तसेच मोठ्या प्रमाणात जनाश्रय आहे. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र
संचनालय, होमिओपॅथिक डॉक्टरांना सरकारी नोकऱ्या, तालुका निहाय हॉस्पिटल व क्लिनिकल संशोधन केंद्र आदी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास तो होमिओपॅथीचा निश्चितच सुवर्णकाळ ठरेल.
आमचे गुरूजन
आमच्या होमिओपॅथीच्या यशस्वी वाटचालीसाठी आम्हास डॉ. सुभाष बारकी, डॉ. बाहुबली शहा, डॉ. अरुण जाधव, डॉ. डी. के. पाटील, डॉ. दादा साहेब कवीश्वर, डॉ. पी. वाय. कुलकर्णी, डॉ. एम. बी. पाटील, डॉ. बी. बी. पाटील, डॉ. जे. एस. पाटील, डॉ. रवी पाटील, डॉ. एम. पी. आर्य, डॉ. कुमठा, डॉ. हरी घोलप, डॉ. के. सी. शहा, डॉ. मनीषा सोलंकी, डॉ. राधेश्याम गुंजाळ, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे तसेच आजादी बचाव आंदोलनाचे प्रणेते राजीवभाई दीक्षित यांचे अनमोल सहकार्य लाभले. त्यामुळे उपरोक्त मान्यवर, सहकारी तसेच होमिओपॅथिक औषधे घेणारे रुग्ण यांचे आम्ही कायम स्वरुपी ऋणी आहोत.
होमिओपॅथिक आनंद
सुपरस्टार राजेश खन्ना यांनी सुप्रसिद्ध आनंद या चित्रपटात कॅन्सर झालेली अमर भूमिका साकारली असून त्यांच्यावर विद्यमान सुपरस्टार अमिताभ बच्चन डॉक्टर म्हणून औषधोपचार करताना दाखवले आहे. चित्रपटात राजेश खन्ना यांच्या मृत्यू प्रसंगी अमिताभ बच्चन हे डॉ. बॅनर्जी यांचे होमिओपॅथीक औषध आणा असे म्हणतात. तर मला एवढेच सुचवायचे आहे की जीवनाचा आनंद लुटण्यासाठी पहिल्या पासून होमिओपॅथिक औषध सुरू केल्यास निश्चित आपल्यास दीर्घायुष्य लाभेल. त्यामुळे होमिओपॅथिक औषधे वापरणे ही काळाची गरज आहे.
डॉ. संदेश शहा. मो. 9922419159
डॉ. राधिका संदेश शहा.
मो. 7972544521
डॉ. संदेश शहा हर्बल वर्ल्ड, सुश्रुत हॉस्पिटल, इंदापूर जिल्हा पुणे.(
सोमवार ते बुधवार.)
डॉ. शहा ‘ ज होमिओपॅथिक होलिस्टिक क्लिनिक, रॉयल ऑर्केड, श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या मठाशेजारी, पुणे सातारा रोड, धनकवडी, पुणे. ( गुरुवार ते रविवार )