मविसे पक्षाची डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व प्रांत कार्यालयावर निदर्शने
अमित शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी तर सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रांताधिकारी अकलूज यांच्यामार्फत निवेदन पाठवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठवून परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मरेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अमित शहा यांची हकालपट्टी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मरेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अकलूज येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयावर व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर निदर्शने करण्यात आली.निवेदन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी स्वीकारले.यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,युवा सेना अकलूज शहराध्यक्ष अजित माने,संतोष गुळीक,सिद्धार्थ कांबळे,सोमनाथ कुचेकर,सचिन शिंदे,दत्ता जाधव,विक्रम साळुंखे,किरण खंडागळे,सागर नाईकनवरे, अजय अडगळे,चेतन साठे,विठ्ठल कांबळे,ज्ञानेश्वर लोखंडे,आप्पा खंदारे,विनायक रणदिवे,विकी केसकर,सैलानी सय्यद उपस्थित होते.