शहर

जमिन मिळकतीच्या प्रकरणात 20 लाख रुपयांचा लाचेची मागणी करणाऱ्या वसई मांडवी वनपरिक्षेत्रपाला सह अन्य 2 व्यक्तींवर पालघर ACB हर्षल चव्हाण यांनी केले गुन्हे दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640

वसई येथील एका इसमाची मालकीची गावठण जमीन वसई वन विभागाने ताब्यात घेऊन सील केल्यावर ही जमीन मिळकत दाराला मिळवून देण्यासाठी 20 लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या वनपरिक्षेत्रपाल अधिकारी आणि दोन खाजगी इसमान विरुद्ध अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी वसई मांडवी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत.

वसई येथील एका इसमाची ससूनवघर गाव हद्दीत विस्तारित सर्वे क्रमांक 371(नवीन सर्वे क्रमांक 141) येथे 7 गुंठे जमीन आहे. ही जमीन वसई वन विभाग क्षेत्रात येत आहे. या मुळेही 7 गुंठे जमीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन विभाग बोरीवली पश्चिम मुंबई यांनी ताब्यात घेऊन जागा सील केली आहे.

या जमिनीच्या मिळकतीच्या प्रकरणाबाबत संदीप तुकाराम चौरे वनपरिक्षेत्रपाल अधिकारी मांडवी वन विभाग वसई यांनी वरिष्ठ कार्यालयात सादर करावयाचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल सहाय्यक वनरक्षक घोलविरा डहाणू यांच्याशी बोलून जमीन मिळकतदार ( तक्रारदार ) यांच्या बाजूने देण्याकरिता व कागदोपत्री मदत करण्याकरिता मोबदला म्हणून 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी 16 नोव्हेंबर 2024 रोजी केली होती.
याबाबत जमीन मिळकतदार ( तक्रारदार) यांनी या वनपरिक्षेत्रपाल अधिकाऱ्याची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग कार्यालयात केली होती.

या तक्रारीवरून शिवराज पाटील पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परीक्षेत्र, गजानन राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र, संजय गोविलकर अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र, आणि सुहास शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षल चव्हाण पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार भगत, पोलीस हवालदार भोये, पोलीस हवालदार धारणे, पोलीस हवालदार सुमडा, पोलीस अंमलदार लोहरे, पोलीस अमलदार धवडे, चालक पोलीस अंमलदार गवळी या पथकाने सखोल चौकशी केली असता वनपरिक्षेत्रपाळ संदीप चौरे यांच्या सांगण्यावरून चंद्रकांत पाटील आणि अन्य एक अनोळखी इसम यांनी जमीन मिळकतदार यांच्याकडे वीस लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून दहा लाख रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाल्यावर या तिघांन विरुद्ध वसई मांडवी पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत पुढील चौकशी आणि तपास वसई मांडवी पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button