मोहोळ येथील आरीफभाई बागवान यांनी परिवारा सह केला “उमराह हज” यात्रेचा प्रवास…
🎯 सौदी अरेबियातील पवित्र धर्मस्थळी केली सर्वासाठी प्रार्थना…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
मोहोळ येथील बागवान समाजातील होतकरू आणि कर्तृत्ववान युवक आरीफ रशीदभाई बागवान हे पत्नी आणि आपल्या आत्त्या सह इस्लाम धर्मातील जगप्रसिद्ध “उमराह हज” यात्रेसाठी रवाना झाले होते,त्यांच्या या प्रवासात अकलूज,मोहोळ,सोलापूर येथील हि काही समाज बांधव होते…
आरीफ बागवान आणि त्यांच्या परिवारातील सदस्य “उमराह हज” यात्रेसाठी रवाना होण्यापूर्वी मोहोळ येथील राहत्या घरी “दुआ” चा कार्यक्रम आयोजित केला होता,त्या कार्यक्रमा प्रसंगी अत्यंत भाऊक क्षणी त्यांना सर्व समाज बांधवांच्या वतीने निरोप देण्यात आला होता…
पंधरा ते वीस दिवसांच्या या प्रवासात मुस्लिम धर्मियांचे पवित्र धर्मस्थान असलेल्या सौदी अरेबिया येथील मक्का आणि मदिना येथे सबंध भारतीयांसाठी “दुआ” केल्याचे त्यांनी सांगितले…
या प्रवासावरून आपल्या मायदेशी परतल्यानंतर आरिफभाई बागवान यांनी मोहोळ येथील आपल्या राहत्या घरी “शुक्राना” जेवणाचे आमंत्रण देत सर्व समाज बांधवांच्या उपस्थीती मध्ये “दुआ” चा आणखी एक कार्यक्रम पार पाडला…
सदर कार्यक्रमा प्रसंगी अकलूज,पंढरपूर,मोडनिंब,कुर्डूवाडी,टेंभुर्णी,मोहोळ,सोलापूर,नगर,येथील सर्व पाहुणे रावळे आणि मित्र मंडळी उपस्थित होते…