श्रमाने विद्यार्थी घडतात – मुख्याध्यापक अमोल फुले
अकलूज प्रतिनिधी तात्यासाहेब काटकर
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आनंदनगर या गावात श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन आनंदनगर गावाचे माजी सरपंच वसंत जाधव यांनी केले. उद्घाटनप्रसंगी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाज मन कळते. श्रम, सेवेचा संस्कार होऊन विविध उपक्रम व तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानातून ऊर्जा व ज्ञानप्राप्ती होते. एकत्र काम केल्याने मैत्री भावना, सहकार्य यातून समाजसेवेचा वसा मिळतो, तसेच स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी केले.
प्रास्ताविक मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तानाजी महाडिक यांनी गावांमधील शाळापरिसर, व्यायामशाळा परिसर, समाजमंदिराची स्वच्छता, विविध वस्त्यांमध्ये जाऊन स्वच्छता मोहिम, स्मशानभूमी, नाथबाबा मंदिर, रस्ते स्वच्छता, गावामध्ये शाळा परिसर, ग्रामपंचायत परिसरामध्ये, प्राथमिक शाळा व स्वयंसेवक यांची स्वच्छता फेरी स्वच्छता दिंडी, वृक्षारोपण करून पर्यावरण जागृतीच्या संदर्भात पाणी आडवा पाणी जिरवा संदेश देऊन 50 स्वयंसेवकांकडून सात दिवसांत स्वच्छता करणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिर उद्घाटनप्रसंगी आनंदनगर गावाचे सरपंच राजेंद्र लोंढे, उपसरपंच बाळासाहेब काटकर, माजी सरपंच विठ्ठल शेळमकर, सदस्य गंगाधर चव्हाण, राजेंद्र जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे, शाळेचे शिक्षक, गावातील ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य झाकीर सय्यद, शिक्षक प्रतिनिधी संजय जाधव, शिक्षक शिक्षकेतर सेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे 50 स्वयंसेवक उपस्थित होते.