सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात “अल्पसंख्याक हक्क दिवस” उत्साहात साजरा…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
18 डिसेंबर 2024 रोजी “अल्पसंख्यांक हक्क दिवस” सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या “नियोजन भवन” येथे मोठया उत्साहात पार पडला,या वेळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग उपस्थित होत्या…
सकाळी ठीक 11 वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रत्येक विभागातील अधिकारी जातीने उपस्थित होते,हे विशेष…
मा पंतप्रधान यांनी नव्याने सुरु केलेल्या (1) अल्पसंख्यांक समाजासाठी 15 कलमी कार्यक्रम (2) पंतप्रधान आवास योजना 1st (3) पंतप्रधान आवास योजना 2nd (4) शौचालये (5) उर्दु भवन (6) इदगाह मैदान (7) कब्रस्तान (8) वक्फ बोर्ड (9) अल्पसंख्यांक निधीची तरतूद (10) मुस्लिम समाजा साठीची लाडकी बहिण योजना (11) शैक्षणिक (12) आरोग्य (13) अल्पसंख्यांकाचे संरक्षण (14) मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ (15) तसेच या सारख्या अनेक ज्वलंत विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली…
या वेळी सबंध सोलापूर जिल्ह्यातून मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून आलेले चळवळीतील कार्यकर्त्यांनी आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आप आपल्या विभागातील अडी अडचणी चे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांना दिले…
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांनी आपल्या छोटे खानी भाषणात उपस्थित असलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनावर बोलताना सर्वांची मने जिंकली…
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा “नियोजन समिती” चे अध्यक्ष दिलीप पवार साहेब होते तर मौलाना आर्थिक विकास महामंडळ चे बिराजदार,प्राथमिक शिक्षणाधिकारी अब्दुल कादर शेख,मुलाणी,सोलापुर जमीयीत उलेमा चे अध्यक्ष मौलाना इब्राहिम काश्मी,मौलाना हरीस यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष नजीर इनामदार (मंगळवेढा),जे के बागवान (सोलापूर),आदम बागवान,आसिफ बागवान (सोलापूर),टाइम्स 9 न्यूज अकलूज चे प्रतिनिधी आमीर मोहोळकर,बिलाल बागवान (मंगळवेढा),पंढरपूर चे जमीरभाई तांबोळी,रशीद तांबोळी (मंगळवेढा),अय्याज दिना (मेंबर),आसिफ नदाफ,फारुख मटके,जहांगीर बिजापूरे,इरफान शेख,रियाज मोमीन,याकूब एम आर यांच्या सह सोलापूर जिल्हयातील 11 तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते…
आज 18 डिसेंबर 2024 रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठया आनंदाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला…