क्रांतीसिंह माने पाटील मित्र मंडळाच्या वतीने दत्त जयंती निमित्त अन्नदान…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज येथील क्रांतीसिंह माने पाटील यांच्या वतीने कलयुगी अवतार श्री दत्त जयंती निमित्त भव्य असा अन्नदान वाटपाचा कार्यक्रम पार पडला,प्रती वर्षी प्रमाणे क्रांतीसिंह माने पाटील रिक्षा स्टाफ च्या वतीने ह्या अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता…
क्रांतीसिंह माने पाटील रिक्षा स्टाफ च्या वतीने दर वर्षी आषाढी वारी निमीत्त पंढरपूर येथे निघालेल्या हजारों वारकरी संप्रदायाला हि अन्नदान वाटपाचे काम केले जाते,अगदी त्याच अनुषंगाने याही वर्षी श्री दत्त जयंती निमित्त भव्य असा अन्नदान वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती क्रांतीसिंह माने पाटील रिक्षा स्टाफ च्या कार्यकर्त्यांनी दिली…
अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांनी क्रांतीसिंह माने पाटील रिक्षा स्टाफ ने आयोजीत केलेल्या अन्नदान वाटपाचे कार्यक्रमास भेट देत संबंधित सर्व रिक्षा स्टाफ च्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले,या वेळी हजारों भाविकांनी अन्नदानाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला…