एक सुरेल प्रवास अखेर थांबला..! उस्ताद जाकीर हुसेन यांचं निधन…
🎯 आज खऱ्या अर्थाने भारतीय “तबला” पोरका झाला…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
सुप्रसिद्ध “तबला” वादक “पद्म विभूषण” जाकीर हुसैन यांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी आहे,मृत्यू समयी त्यांचे वय 73 वर्षाचे होते,संगीत क्षेत्रात “उस्ताद” या नावाने ओळखले जाणारे जाकीर हुसेन यांनी तबला वादनाने सबंध जगाच्या संगीत प्रेमी मध्ये आपले नाव अजरामर केले होते…
उस्ताद जाकीर हुसेन यांनी “तबला” वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली,परंपरा आणि नावीन्य यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या वादन शैलीत होते.सूरांचा आविष्कार करताना त्यांनी लाखो रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीताचे जागतिक “राजदूत” आपण गमावले आहेत,हे मात्र नक्की…
भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तीनीं उस्ताद जाकीर हुसेन यांच्या जाण्याने शोक व्यक्त करत त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली…
उस्ताद जाकीर हुसेन यांनी तबला वादनात अक्षरशः हुकूमत गाजवली,त्यांना अनादी काळा पासून वादन क्षेत्राचा अभ्यास तर होताच परंतु त्यांनी स्वतःचे काही तबल्याचे बोल नवीन मिक्स संगीताला अनुरूप असे काही बोल चे संशोधन केले होते,त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची खूप माठी हानी झालेली आहे,उस्ताद जाकीर हुसेन हे “महान” व्यक्तीमत्व तसेच देशाच “वैभव” होते…
टाइम्स 9 न्यूज परिवाराच्या वतीने उस्ताद जाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!💐💐💐