सफाळे माकणे येथून ट्रिपल सीट जाणाऱ्या मोटरसायकलचा अपघात
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
सफाळे विटीलाईन रस्त्यावरील माकणे जुना कोंडवाडा मोरी जवळ दोन तरुणांचा अपघात झाला असून या अपघातात या दुचाकी वरील तीन जणांपैकी दोन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत तर त्यांचा तिसऱ्या मित्र सुखरूपपणे बचावला आहे . या दोन जणांना उपचारासाठी माकणे येथील स्वास्थ्यम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालघर वरकुंटे येथे राहणारे विनीत आगरी आणि आदित्य काकड आणि त्यांचा एक तिसरा मित्र हे तिघेजण रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी क्रिकेटच्या मॅच खेळण्यासाठी सफाळे येथील शिलटे पाडा या गावात गेले होते.मॅच खेळून झाल्यानंतर 4.30 वाजता हे शिलटे पाडा येथून आपल्या पालघर
वरकुंटे गावाकडे विना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून भरधाव वेगाने विटी लाईन रस्त्यावरून जात असताना त्यांचा तोल जाऊन ते माकणे कोंडवाडा येथे असलेल्या मोरीत जाऊन पडल्यामुळे ते जबरी रित्या जखमी झाले आहेत.त्यांच्या डोक्याला व हाता पायाला जबरी दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी माकणे येथील स्वास्थ्यम रुग्णालयात दाखल केले आहे.