करमाळा तहसील कचेरीच्या आवारात पिण्याच्या पाण्याची सोय करा,.. प्रहार संघटना याची मागणी…
करमाळा प्रतिनिधी,
करमाळा तालुक्यातील नागरीक चाळीस-पन्नास किलोमीटर अंतरावरून तहसील कचेरी पंचायत समिती पोलीस स्टेशन व इतर सर्व प्रशासकीय कामासाठी येत असतात. मात्र तहसील कचरीचा आवारात कुठेही पिण्याच्या पाण्याची सर्वसामान्यांसाठी सोय उपलब्ध नाही.
पिण्याच्या पाण्याची सोय तत्काळ करावी म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांना पाण्याची सोय करावी असे पत्र प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम मराठा सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष सचिन काळे, यांनी एकत्र येत तहसील कचेरी पंचायत समिती पोलीस स्टेशन या सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये पाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून माननीय तहसीलदार मॅडम, करमाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब व पोलीस स्टेशन करमाळा, यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले त्यावेळेस संदीप तळेकर यांनी सुचवले जर तुम्ही 118 गावांमध्ये पाणीटंचाईसाठी वाड्यावर त्यावरती व गावांमध्ये पाण्याचे टँकर चालू करता तिच्या आवारात तर मग करमाळा तहसील कचऱ्याच्या आवारात पाण्याचा टँकर का चालू करत नाहीत. तसेच बहुजन संघर्ष सेनेचे नेते राजाभाऊ कदम यांनीही गटविकास अधिकारी यांना प्रतिप्रश्न विचारला या पत्रावर आपण काय निर्णय घेणार यावेळी गटविकास अधिकारी यांनी सावधगिरीने प्रतिक्रिया देत याचे लवकरच नियोजन करू असे तोंडी सांगितले यावरती तहसीलदार मॅडम व बि.डि.ओ यांनी टँकर चालू करण्याची आश्वासन दिले. यावेळी प्रहार चे अध्यक्ष संदीप तळेकर बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा अध्यक्ष श्री राजाभाऊ कदम मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे बापू नेते तळेकर करमाळा तालुका संघटक नामदेव पालवे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.