विशेष

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा व गुढीपाढवा सण विक्रमगड शहरात आनंदात साजरा

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर टाईम्स 9 मराठी न्युज

नेटवर्क चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर, गुढीपाडव्याचा एक भव्य उत्सव, ज्याला हिंदू नववर्ष देखील म्हटले जाते, मंगळवार ९ एप्रिल २०२४ रोजी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड शहरात हिंदू नववर्ष स्वागतनिमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.

हिंदू धर्मात गुढी पाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. त्यामुळे हा दिवस खास असतो. आज राज्यातील अनेक शहरात गुढी पाडव्यानिमित्त शोभा यात्रा काढण्यात येते,

तसेच घरोघरी गुढी उभारून नवावर्ष स्वागत केले गेले. स्वागत यात्रेत स्वामी नरेंद्र महाराज यांचे कार्येकर्ते मा.अनंत ठाकरे, जिल्हा अध्यक्ष बबन शेलार, तालुका अध्यक्ष यतीन देसले, जिल्हा निरीक्षक विश्वास पाटील, संघाचे कार्येकर्ते आदित्य आळशी, रमेश भोईर, अनिल बडगुजर, संजय भोईर, संजय नेवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते, स्वागत यात्रेत रथ,लेझीम पथक,ढोल पथक,ध्वज पथक तसेच महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून डोक्यावर कळस घेऊन स्वागत यात्रेत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button