महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज…धैर्यशील मोहिते यांच्या वाढदिवसा निमित्त विकासाचं रणशिंग “तुतारी” ने फुंकणार…? सूत्रांची माहिती

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाईल नंबर 9890299499

येत्या 13 एप्रिल ला अकलूज च्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचं रणशिंग “तुतारी” ने फुंकणार असल्याची माहिती टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क च्या सुत्रांनी दिली…

अनेक राजकीय घडामोडींना फाटा देत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं प्रस्थ असलेल मोहिते पाटील कुटुंब शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त टाइम्स 9 च्या हाती लागले…

या दरम्यान फलटण चे रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांच्या भूमिकेकडे हि सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले असुन जनता मात्र सभ्रंम अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे…

धैर्यशील मोहिते पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्या समवेत सोलापूर येथे जाऊन 16 एप्रिल रोजी आपला निवडणुक अर्ज भरतील अशी माहिती हि समोर येत आहे…

धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी अर्ज भरते वेळी स्वतः शरद पवार,विजयसिंह मोहिते पाटील,सुशीलकुमार शिंदे यांच्या सह दिग्गज राजकीय नेते मंडळी हि उपस्थित राहणार असण्याची शक्यता सुत्रांनी दिली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button