त्या दोन पोस्ट ,,,, आणि हादरलेल वास्तव
ऍड अविनाश टी काले , डॉ आंबेडकर चौक ,अकलूज
तालुका , माळशिरस जिल्हा सोलापूर ,
मो नंबर 9960178213
समीर सय्यद यांची एक पोस्ट दर्गाह सुशोभीकरण आणि कब्रस्तान कंपाऊंड मध्ये अडकलेला समाज नावाची पोस्ट आणि धाराशिव भागातील कान गाव गावातील आंबेडकरी समाजाच्या वाट्याला आलेला संघर्ष , तेथील भीम जयंतीला होणारा सुवर्ण समाजाचा विरोध , बौद्ध विहाराला लावलेले कुलूप यातून ते गाव सोडून निघालेले समाज बांधव या दोन बाबी नी सकाळ पासून मी आत्यंतिक अस्वस्थ आहे
वामन जी मेश्राम साहेब अनेक मुस्लिम समाजाच्या विचार पिठावर बोलतांना ,” मुस्लिम समाज के लोगो ने मुजलमो के साथ खडे रहणा चाहिए ” हे वक्तव्य मी अनेकदा ऐकलेल , त्यामुळे मुस्लिम समाज हा शक्तिशाली आहे असाच माझा समज झाला होता यातून माझी मनोदशा ही याच दिशेने झुकली होती की बहुजनांच्या संघर्षात मुस्लिम समाज सहभागी होत नाही व तो तटस्थ राहतो ,
सोलापूर येथील मुस्लिम कार्यकर्त्या समवेत ही या वरुन वाद विवाद झाला होता , तेंव्हा तो कार्यकर्ता म्हणाला होता , ते स्वतः इतके गोंधळलेले आणि भित्रे बनलेले आहेत की , त्यांचे विरोधात कितीही कृत्य झाली तरी ते स्व रक्षणासाठी ही येत नाहीत मी नेहमी पाहतो की मुस्लिम समाजाचा नेता स्थानिक स्वराज्य संस्थेकडे फक्त एकच मागणी करत राहतो ती मागणी कब्रस्तांन ची सुरक्षा करणारी कंपाऊंड भिंत , आणि सामाजिक स्तरावर अगदी विवाह समारंभात ही त्यांच्या धार्मिक शाळा (मदरसा )चालवण्या बाबत केलेले दानाचे आवाहन किंवा दर्गा , मस्जिद बांधणी साठी समाजातून गोळा करण्यात येणारा चंदा , असेच स्वरूप असते
रमजान चे पवित्र महिन्यात इफ्तार पार्टी चे आयोजन केले जाते , आणि हमखास त्या गावातील , शहरातील , गैर मुस्लिम राजकीय नेत्यांना प्रमुख म्हणून बोलावले जाते आणि त्यांची सरबराई केली जाते ,समाजातील दोन चार राजकीय नेते त्या नेत्यांच्या अधिपत्याखाली अनुयायी म्हणून काम करत असतात ,आपल्या समाजाच्या मूलभूत बाबी ची , त्यांच्या गरजा ची कोणतीही मागणी ते करत नाहीत ,म्हणून सच्चर आयोगाने केलेल्या पाहणीत मुस्लिम समाजाचे शैक्षणिक , आर्थिक , पातळीवर तो अधिक अविकसित असल्याचे सांगितले आहे
द्वी राष्ट्र सिद्धांत हा या देशाच्या फाळणीला कारणीभूत ठरला , “मुस्लिम”समाजातील मोठा भाग पाकिस्तान व बांगला देश यात निघून गेला व त्या नंतर उर्वरित मुस्लिम ज्यातील 95%हुन अधिक हे सुफी संत परंपरेला मानणारे , त्यामुळे ते भारतात राहिले , हा वर्ग जसा अल्लाह का मानतो , तसाच तो ह मुहम्मद स , यांना व त्याच समवेत पिर , सुफी संत यांना ही मानत असल्याने जगातील कडवे मुस्लिम त्यांना आपले मानत नाहीत , आणि भारतातील कडवे हिंदुत्व वादी ही त्यांना भारतीय मानण्यास नकार देत आहेत , व त्यांचे अध्यात्मिक माण्यतेला जितके छेद देता येतील , त्यांची जितकी मान हानी करता येईल तितकी करून सातत्याने त्यांना डिवचन्याचा प्रयत्न केला जात आहे
त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी , ते शासन व्यवस्थेत , प्रशासनात भागीदार असावेत असे न वाटणाऱ्या नेत्यांची यादी वाढलेली असून त्याचेच प्रतिबिंब नेत्यात दिसून येते , समीर यांनी मग हे ही दर्शवून दिले की कोणत्याही निवडणुकीचे परिणाम पलटवण्या ची शक्ती असलेला हा समाज फक्त निवडणुकीतील मतदानासाठी आंजरला गोंजरला जातो , त्यांना फक्त गोड बोलले जाते , आणि तो त्याच्या मेहनती आधारे जगत राहतो , जगण्याच्या शर्यतीत तो मिळेल ते काम करत राहतो ,
आजच्या काळात धर्म विद्वेष व चिथावणी खोर भाषणे यामुळे हा समाज बहुसंख्यांक समाजाने तिरस्कृत ठरवलेला आहे तर दुसऱ्या बाजूने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माची केलेली चिकित्सा आणि त्या नंतर जातीय गुलामीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणून केलेले धर्मांतर , ही बाब उच्च वर्णीय समाजाच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी केलेल्या विषारी प्रचारामुळे आंबेडकरी समाज हा बहुसंख्याक हिंदू चे दृष्टीने बहिष्कृत आहे , त्यामुळे याही समाजाच्या वाट्याला राजकीय आर्थिक सामाजिक उपेक्षेचा सामना करावा लागत आहे ,
यातूनच महाराष्ट्रात कान गाव सारखे प्रकरण घडते , दोन कुटुंबातील भांडण याचा गैर फायदा घेऊन बौद्ध विहार कुलूप बंद केले जाते , गेली 5वर्ष त्या गावात साधी आंबेडकर जयंती काढू दिली जात नाही , मग सरकार महा विकास आघाडीचे ही होते , आणि सत्ता पालट झाल्या नंतर ते भाजपा व शिंदे गटाचे मिळून अस्तित्वात आणले गेले , व्यवस्थेला न्याय द्यायचा नसेल तर एखादी व्यक्ती किती ही कायदेतज्ज्ञ असली तरी ही त्याचा पराभव ही व्यवस्था सहजी करते ,हे समजून घ्यावे लागते , आणि नाही समजून घेतले तर घोळ होतो च होतो
इथे समग्र नवबौध्द समाज गाव सोडून निघालेला पाहताना चीड आणि संताप येणे साहजिक आहे , म्हणून आपणास व्यवस्था बदलाची तयारी करावी लागेल ,
जे लोक किंवा जाती समूह येतील त्यांना समवेत घेऊन बहिष्कृत समाज (नवबौध्द)आणि तिरस्कृत समाज (मुस्लिम)यांनी राजकीय पर्याय म्हणून प्रस्थापित अन्याय कर्त्या व्यवस्थेच्या अधीन जाण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडी चां पर्याय राजकारणातील पर्याय म्हणून स्वीकारला तर अनेक बदल दिसून येतील , व ते अधिक परिणाम कारक असतील.