महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखक यांच्यावरील अन्यायकारक प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यावरील अन्यायकारक प्रश्नाबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “शासनमान्य मुद्रांक विक्रेता दस्त लेखक महासंघ “–महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने निवेदन देण्यात आले असून महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संपूर्ण राज्यात प्रत्येक तालुक्यातील ब्रिटिश काळापासून ग्रामीण भागातील नागरिकांना महसुली सेवा पुरवण्याकरिता नियुक्ती केली होती

आमच्या माध्यमातून आम्ही शासनाच्या महसूल वाढीच्या दृष्टिकोनातून शासनाचे मार्गदर्शक तत्वे ग्रामीण भागातील लोकांना पटवून देऊन मुद्रांक विक्रीवर दस्तलेखक यांच्या माध्यमातून शासनास मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध करून देत आलो आहोत आज ही आम्ही वरील सेवा शासनास देत आहोत परंतु अलीकडच्या काळात काही बाहेरच्या लोकांनी मुद्रांक घोटाळे व बनावट मुद्रांक हे मोठ्या प्रमाणात भारतीय चलनासारखे व्यवहारात आणले व सदरचा मुद्रांक विक्रीचा व्यवसाय धोक्यात आणला

सर्व मुद्रांक घोटाळे विचारात घेता शासनास ही त्यावर अनेक उपाय योजना करणे भाग पडले त्यात आम्ही मुद्रांक विक्रेते व दस्त लेखक विनाकारण भरडले गेलो महाराष्ट्रातील कोणताही अधिकृत मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक वरील मुद्रांक घोटाळ्यामध्ये आज तागायत नाही मात्र शासनाने केलेल्या उपाययोजनेत मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक मात्र भरडला गेला हा आमच्यावर झालेला अन्याय असून त्यामुळे आम्ही आपणाकडे आमच्या मागण्या मांडत आहोत यावर आपण योग्य प्रकारे निर्णय घ्याल याची आम्हा मुद्रांक विक्रेता व दस्तलेखन यांना पूर्ण विश्वास आहे मुद्रांक विक्रेते व दस्त लेखक यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे;-

1) महाराष्ट्रातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांना तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये एक कक्ष दिला जात असे आजही बऱ्याच तालुक्यामध्ये असे कक्ष विकसनाचे निमित्ताने अथवा अन्य कारणाने काढून घेतलेले असतील अशा ठिकाणी मुद्रांक विक्रेत्यांना असे कक्ष तातडीने देण्यात यावे कारण सद्य परिस्थितीमध्ये सर्व महसुली काम व मुद्रांक वितरण हे ऑनलाईन झालेले आहे त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात संगणकाचा वापर करावा लागतो त्यात बाहेरील जुळीने व वातावरणाने संगणक खराब होतात व अनेक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे कक्ष असणे गरजेचे आहे

तसेच मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांचे कडे येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील असल्याने त्यांना बँक व्यवहार कसे करावे याची माहिती नसल्याने बरेचसे व्यवहार हे (नगदी ) रोखीत होतात व बरेच लोक हे मुद्रांक रोख रक्कम देऊनच विकत घेतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नित्याचा भेडसावणारा आहे त्यामुळे कक्ष असणे गरजेचे आहे मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांना नवीन परवाने देणे शासनाने बंद केलेले आहे अनेक मुद्रांक विक्रेत्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्या मुद्रांक विक्रेत्यांच्या कुटुंबाचे उपजीविकेचा प्रश्न तात्काळ तयार होतो अशावेळी ते कुटुंब उघड्यावर येते त्याकरिता अशाप्रसंगी त्यांच्या वारसांना ताबडतोब मुद्रांक विक्रीचा परवाना देण्यात यावा ही आमची महत्त्वाची मागणी आहे
यापूर्वी आम्हास शासनाने रक्कम रुपये 30,000/- रुपये पर्यंतचे मुद्रांक विक्री करण्याची परवानगी दिली होती त्यावर आम्हास 3%टक्के प्रमाणे कमिशन मिळत होते परंतु काही वर्षांपूर्वी शासनाने आम्हास फक्त 100 रुपये व 500 रुपये चे मुद्रांक विक्रीची परवानगी आहे व शासनाचे कमिशन 3 % टक्के ठेवले आहे त्यामुळे मिळणारे उत्पन्न अत्यंत तुटपुंजे असून त्यात मुद्रांक विक्रीचे रजिस्टर त्यास लागणारे स्टेशनरी व जबाबदारीच्या सर्व बाबीचा विचार केला

तर मिळणारे उत्पन्न व होणारा खर्च याचा कोठेही ताळमेळ बसत नाही तरी मुजरांक विक्रीचे कमिशन वाढवून मिळावे किंवा मुद्रांक विक्रीवर सेवा शुल्क ग्राहकाकडून घेण्याचा अधिकार आम्हास द्यावा व ते शुल्क शासनाने आम्हाला ठरवून द्यावे तसेच रक्कम 30 हजार रुपये पावेतोचे इत्यादी चरण हे मुद्रांक विक्रेत्यांच्या मार्फतच काढण्यात यावे इत्यादी मागण्या या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे



