महाराष्ट्रातील मंदिरात ब्राह्मण पुरोहित हटवून बहुजन समाजातील मुल मुली पुजारी व सेवक म्हणून नेमणूक करण्याची मराठा सेवा संघाची मागणी

उपसंपादक------- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी राजे भोसले छत्रपती ह्या काळा राममंदिर नाशिक येथे श्रीराम दर्शन व अन्य धार्मिक विधी साठी गेल्या होत्या. त्यावळी त्यांनी विधी साठी नेमलेल्या पुजारी पुरोहित भटजी ब्राह्मण यांनी वेदोक्त मंत्र ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत विधी सुरू केल होते. युवराज्ञी संयोगिता राजे यांच्या ही बाब लक्षात आली.

त्यांनी पुराहितास थांबवून वदोक्त मंत्रांचा जप करावा अशी सूचना केली होती. परंतू ब्राह्मण पुराहितांनी ती सूचना युवराज्ञी संयागिता राजे शूद्र असल्याने मान्य केली नाही. यात पुरोहितांनी युवराज्ञी संयागिता राजे यांचा उघडपणे अपमान केला होता हे स्पष्ट होते. त्यामुळे तेथेच थोडफार वादविवाद झाले. आणि युवराज्ञी संयोगिता राजे यांनी काळा राम मंदिर परिसर सोडला. असे असले तरी युवराज्ञी संयोगिता राजे यांनी तत्कालीन परिस्थितीत तो अपमान गिळून वातावरण शांत ठेवेल असे लक्षात येते. मराठा सेवा संघ काळा राम मंदिर मधील या दुर्घटनाचा जाहीर निषेध करुन महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरातील ब्राह्मण पुरोहित हटविण्याची व बहुजन समाजातील मुल मुली पुजारी व सेवक पदावर नेमण्याची मागणी करत आहे.
दोन दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया ग्रुप वर युवराज्ञी संयोगिता राजे यांची ह्या संतापजनक घटनेची माहिती देणारी पोस्ट वाचनात आली. सर्वप्रथम आम्ही मराठा सेवा संघाच्या वतीने काळा राम मंदिर नाशिक येथील सर्व पुरोहित भटजी ब्राह्मण वर्गाचा जाहीर निषेध करतो. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी असेच वदोक्त प्रकरण राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबतीत कोल्हापूर येथे निर्माण झाले होते. वर्तमान काळात भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या राज्यात पुन्हा एकदा त्याच घराण्यातील युवराज्ञी संयोगिता राज यांना तशाच विधी प्रकरणाला तोंड द्यावे लागते ही बाब निषेधार्थ व गंभीर असून संविधान विरोधी आहे. यावरून छत्रपती घराण्यातील युवराज्ञी बाबतीत जर असे प्रकार घडत असतील तर सामान्य जनतेच्या बाबतीत किती क्रुरपणा होत असेल याची कल्पनाही करवत नाही.

या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आमची जाहीर मागणी आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरातील वंश परंपरागत सुरू असलली भटजी पुरोहित ब्राह्मण यांची विधी व अन्य मक्तेदारी संपुष्टात आणावी. तसच सर्व मंदिरात भाविकांची गर्दी व कुचंबणा टाळण्यासाठी मंडल आयोगाच्या नुसार बहुजन समाजातील पुजारी नेमावेत. श्रीविठ्ठल मंदिर पंढरपूर येथे अशी सुविधा उपलब्ध झाली आहे. तरी राज्यभरातील सर्व लहानमोठ्या मंदीरात बहुजन समाजातील पुजारी व सेवक नेमण्याची प्रक्रिया त्वरित हाती घेण्यात यावी. अन्यथा हा भारतीय संविधानाचा अपमान होत आहे असे मानले जाईल.
या निमित्ताने एक महत्वाची बाब लक्षात घेणे गरजच वाटते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्याची मागणी कली असता मराठा समाज सवर्ण पुढारलला क्षत्रिय समाज असल्याचे सांगून आरक्षण नाकारले जाते. तर जेंव्हा जेंव्हा धार्मिक अधिकारांचा वापर करण्याची मागणी केली जाते तेंव्हा तेंव्हा मराठा समाज शूद्र ठरविला जातो. यावरून मराठा समाजाची सार्वजनिक कुचंबणा होत आहे असे म्हणायला हरकत नाही. हीच खेळी अन्य बहुजन समाजातील सर्व घटकांच्या बाबतीत वापरली जात व सामाजिक कटुता निर्माण केली जाते. बहुजन समाजाला जागृत व सावधान राहण्याची गरज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन वेळी प्रवेशाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी होती. आता युवराज्ञी संयोगिता राजे यांच्या वेदाक्त प्रकरणामुळे महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरामध्ये सरसकट सर्व हिंदू समाजातील स्त्री व पुरुष यांना मुक्त प्रवेश मिळण्यासह तिथे बहुजन समाजातील स्त्रिया व पुरुष यांना पुजारी व सेवक पदावर नेमण्याची मागणी आहे. महाराष्ट्रात वाढलेली बेरोजगारी पाहता सर्वच मंदिरात बहुजन पुजारी व सेवक नियुक्त केले तर कमीत कमी दोन लाख रोजगार उपलब्ध हाईल. याची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष कायदा व नियम करावेत अशी मराठा सेवा संघ जाहीर मागणी करत आहे. तसेच यासाठी सर्वांनीच एकत्रित येऊन मोठ जन आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या केंद्र स्थानी व बहुतांशी राज्यात हिंदुत्ववादी विचारधारा मानणारे सरकार आहे. सर्व हिंदू एक असे नारे दिले जात आहेत !!!. पण व्यवहारात तसे होत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन एससी एसटी ओबीसी ओपन घटकांना अपेक्षित समता व समन्यायी धर्माधिकार मिळण्यासाठी भारतातील सर्वच हिंदू मंदिरे भटमुक्त करण्याचा निर्णय घेऊन त्वरित अंमलात आणावा ही विनंती आहे. अखिल भारतीय पातळीवर सर्वच मंदिरात सुमारे पंचवीस लाख बहुजन पुजारी व सेवक नियुक्त केले जाऊ शकतात. यामुळे सर्वच हिंदू समाज आनंदीत होईल. कृपया राज्य व केंद्र सरकारने गंभीरपणे दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती . मराठा सेवा संघ. संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर ,चिखली यांनी पञाद्वारे केली आहे.



