संभाजी ब्रिगेड सोलापूर-पंढरपूर विभागाची आढावा बैठक अकलुज येथे संपन्नइथून पुढच्या काळात संभाजी ब्रिगेड विविध प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणार – जिल्हाध्यक्ष सचिन जगताप

उपसंपादक—-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
संभाजी ब्रिगेड सोलापूर-पंढरपूर विभागाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष-सचिन जगताप अध्यक्षतेखाली तर शिवश्री दिनेश जगदाळे-राज्य कार्य.सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली.
प्रारंभी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करून व जिजाऊ वंदना घेऊन बैठकीची सुरुवात करण्यात आली

तसेच येणाऱ्या काळात पंचायत समिती, मार्केट कमिटी ,जिल्हा परिषदेच्या, निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार असून प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व सोलापूर पंढरपूर विभागातील तालुक्यातील गावागावात गाव तिथे संभाजी ब्रिगेडची शाखा काढावी असे आदेश देण्यात आले , इथून पुढच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, दिवसेंदिवस वाढत्या महागाईचा प्रश्न असेल तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल व वारंवार जाणीवपूर्वक महापुरुषांची बदनामी केली जात असेल, या विविध प्रश्नावरती इथून पुढच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमकपणे भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही असे या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी सांगितले,संभाजी ब्रिगेड सांगली संपर्कप्रमुख दिनेश जगदाळे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटने विषयी काही सूचना दिल्या व मार्गदर्शन केले
याप्रसंगी संभाजी ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभागाच्या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे अनिल यादव ,जिल्हाउपाध्यक्ष,शंकर पोळ, जिल्हा उपाध्यक्ष,प्रमोद जगदाळे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष,किरण कचरे,जिल्हा संघटक,विजयकुमार परबत , जिल्हा संघटक कुर्डूवाडी, रणजीत चव्हाण ,जिल्हा संघटक,दत्ता ताड ,पंढरपूर तालुकाध्यक्ष,अमित घोगरे , करमाळा तालुकाध्यक्ष,प्रकाश गाजरे ,पंढरपूर तालुका उपाध्यक्ष, अमोल कुंभार ,विधानसभा अध्यक्ष पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा,बाळासाहेब वागज सर ,तालुका उपाध्यक्ष माढा, किरण जाधव ,विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष माढा,सचिन पराडे पाटील , माळशिरस तालुका उपाध्यक्ष,शहाजी यशवंत गोरे , संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी माळशिरस तालुका,रामभाऊ कांबळे ,कामगार आघाडी माळशिरस तालुका उपाध्यक्ष, तसेच नागराज पाटील,संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते अशोक मिसाळ, सोमनाथ गाडे,मोहसीन सय्यद, विनोज शेख ,फारुक शेख, युवराज केंगार,धीरज पवार, सूर्यकांत मिसाळ-ग्रां.प.सदस्य वाघोली,दत्तात्रय मिसाळ-ग्रां.प.सदस्य वाघोली, अशोकराव चव्हाण वि,का,से सो सदस्य,राजेश पवार – वेळापूर, उंबरे व संभाजी ब्रिगेड सोलापूर, पंढरपूर विभागातील सर्व जिल्हा कार्यकारणी महिला,विद्यार्थी कामगार आघाडी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विभाग प्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

या बैठकीचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी केले तर संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक रणजित चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन सचिन पराडे संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका उपाध्यक्ष यांनी केले आपण सर्वजण या बैठकीसाठी आवर्जून मोठ्या संख्येने जिल्ह्यातून उपस्थित राहिल्याबद्दल संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुक्याच्या वतीने आपलं मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.



