पुणे ग्रामीण भिगवण पोलीस ठाण्याचे हवालदार रामदास जाधव अँटी करप्शन ब्युरो पुणे युनिट पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640.
शेताच्या वादावरून पुणे ग्रामीण येथील भिगवण पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पुणे ग्रामीण भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामदास जाधव यांनी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून अंतिम तडजोड 20 हजार रुपये अशी लाचेची मागणी केल्याप्रकरणी श्रीहरी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपअधीक्षक (प्रशासन)लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिट यांनी या पोलीस हवलदाराला सोमवारी अटक करून त्याच्यावर पुणे ग्रामीण भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे ग्रामीण भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील (42)वर्षीय तक्रारदार यांच्या शेतीच्या जमिनीच्या वादातून पुणे भिगवण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्यांचा ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केला आहे. हा ट्रॅक्टर सोडवण्यासाठी (42)वर्षीय तक्रारदार पोलीस ठाण्यात गेल्यावर पुणे भिगवण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामदास जाधव यांनी तक्रारदार यांना हा ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 25 हजार रुपये लागतील असे सांगितले यानंतर या पोलीस हवालदाराने अंतिम तडजोड 20 हजार रुपये लागतील असे तक्रारदार यांना सांगितल्यावर तक्रारदार यांनी याबाबत या हवलदाराची लेखी तक्रार पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात केली होती.
या तक्रारीची पडताळणी करून श्री.अमोल तांबे पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक (पुणे परिक्षेत्र) व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लाच लुचपत प्रतिबंध विभाग (पुणे)यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीहरी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपअधीक्षक (प्रशासन)लाच लुचपत प्रतिबंध विभाग पुणे युनिट यांनी सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी पुणे ग्रामीण भिगवण पोलीस हवालदार रामदास लक्ष्मण जाधव यांना अटक करून त्यांच्यावर भिगवण पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करत आहेत.



