क्रीडा

राज्यस्तरीय फार्मा क्रिकेट स्पर्धेत लाखेवाडी येथील विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रयत्नात पटकावला चतुर्थ क्रमांक

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल 8378076123

: सातव्या राज्यस्तरीय फार्मा क्रिकेट कप मध्ये लाखेवाडी येथील जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीने चतुर्थ क्रमांक मिळवला आहे. शिरूर येथील सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये या स्पर्धा पार पडल्या.

जवळपास चार दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ३२ संघ सहभागी झाले होते. यामध्ये चतुर्थ क्रमांकासह कॉलेज ऑफ फार्मसीच्या संघाला रुपये ५ हजार ५५५ रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेमध्ये झालेल्या विविध सामन्यांमध्ये लाखेवाडी कॉलेज ऑफ फार्मसीचे खेळाडू शिवतेज दडस व स्मितेश पाटील यांना वेगवेगळ्या सामन्यांत सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर शिवतेज दडस यास स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅटसमन म्हणून त्याला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

खेळाडूंचे अभिनंदन करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य सम्राट खेडकर यांनी विद्यार्थ्यांनी जीवनाच्या स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान लाभत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत अशा प्रकारच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा असे सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, वैभव भागवत, स्वप्निल नाझरकर, ओंकार डोके, अमोल बन यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व त्यांचे पालकांमार्फत कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत प्रथमच सहभागी होत चौथ्या स्थानापर्यत मजल मारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फोटो – लाखेवाडी येथील विद्यानिकेतन काॅलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सन्मानचिन्हासह आनंद साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button