तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांचा पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील यांच्याकडून गौरव पत्र देऊन सन्मान.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
पोलीस दलातील आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडून सामाजिक बांधिलकी म्हणून केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सुशिक्षित बेरोजगार तरुण- तरुणींसाठी केळवा पोलीस ठाणे हद्दीत भव्य रोजगार मेळावा आयोजित करून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांना पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील यांच्याकडून गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.बाळासाहेब पाटील आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.पंकज शिरसाट यांच्या आदेशान्वये डीवायएसपी शैलेश काळे,उपविभागीय पालघर पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पालघर जिल्ह्यात जिल्हा पोलीस दल यांच्यामार्फत राबवण्यात येत असलेल्या जनसंवाद अभियाना अंतर्गत केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी सागरी केळवा पोलीस ठाणे हद्दीत सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी 28 फेब्रुवारी 2023 रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
या रोजगार मेळाव्यामध्ये सफाळे-केळवा परिसरातील युवा तरुण आणि तरुणीने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या मेळाव्यात उपस्थित बेरोजगार तरुण आणि युवा तरुणींच्या पालघर जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांनी मुलाखती घेऊन पात्र असलेल्या उमेदवारांना नोकरी हमीपत्र देऊन त्यांची नियुक्ती केली होती. केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी सर्वप्रथम पालघर जिल्ह्यात आपली पोलीस दलातील कर्तव्य जबाबदारी उत्कृष्टपणे बजावत असताना आपली सामाजिक बांधिलकी आणि समाजकार्य करून केलेल्या त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.



