महाराष्ट्र

कारूडे येथे महिला शेतकरी मेळावा संपन्न.

उपसंपादक——-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक महिला दिना निमित्त मौजे कारुंडे येथे रविवारी दिनांक २६ मार्च रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय जोडणी प्रकल्प नैसार्गिक रेझीन व डीक तोडणी प्रक्रिया व मुल्यवर्धन कृषि अन्नतंत्र महाविद्यालय परभणी, गौतमी महीला अँग्रो फुड प्रॉडक्टस इंडिया प्रा लि कारुंडे , चैतन्य महिला ग्रामसं घ व मंडळ कृषि अधिकारी नातेफते यांचे संयुक्त विद्यमाने कारुंडे ‘ धर्मपरी, पिपरी , कोथळे, गुरसाळे येथील महिला बचत गट यांचा शेतकरी महिलांचा गवार पीक लागवड डींक निर्मिती प्रकल्प , पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग (PM FME ) व बाळासाहेब ठाकरे कृषि संजीवनी प्रकल्प ( स्मार्ट ) या विषयावर संपन्न झाला .

या कार्यक्रमांत डॉ बी.ए.जाधव शास्त्रज्ञ भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय जोडणी प्रकल्प नैसर्गिक रेझीन व डीक तोडणी प्रक्रिया आणि मुल्यवर्धन अन्नतंत्र महाविद्यालय परभणी यांनी कमी खर्चात हलक्या जमिनीवर कमी पाण्यावर येणाऱ्या आंतराष्ट्रीय व्यापारी महत्व असलेल्या गवार लागवड , डीक उत्पादन , मुल्यवर्धन व प्रक्रिया उदयोग बाबत उपस्थितीत ५ २ महीला व २२ पुरुष शेतकऱ्यांना मार्गदर्शन माहीती, व सल्ला दिला .

मंडळ कृषि अधिकारी नातेपुते सतिश कचरे यांनी पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग वैयाक्तिक लाभ व सामुहीक गट, संघ , या साठी योजना , संधी , वाव , अनुदान तसेच बाळासाहेब ठाकरे कृषि संजीवन प्रकल्प अंतर्गत कंपनी , संघ व गटासाठी योजना बाबत सविस्तर माहिती दिली . श्री सुर्यकांत पाटील चेअरमन वि .का .सो . कारुंडे यांनी कृषि विभाग योजनाचा लाभ विभागाच्या मदतीने घेणेचे अहवान केले . आंबेडकर चळवळीचे नेते विकास दादा धाईजे यांनी स्वयंसहाय्यता गट यांनी गटांनी , संघांनी एकत्रीत येऊन विना ‘ सहकार नही उद्दार ‘ या उक्तीप्रमाणे शासकिय व कृषि विभाग योजना राबवून लाभ घेणेचे अहवान केले .

अँड कमलाकर भोसले कायदेशीर सल्लागार गौतमी महीला अॅग्रो फुड प्रॉडक्टस इंडिया प्रा लि कारुंडे यांनी भाग भांडवल उभारणी, सदस्य वाढविणे व प्रकल्प राबविणे बाबत मार्गदर्शन केले . कार्यक्रमास वरील गावातील महिला स्वयंसहाय्यता गट प्रमुख व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थितीत होते . कार्यक्रमांचे संयोजक व्यवस्थापक नाना हरी गायकवाड यांनी कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ,प्रस्तावना व अभार प्रद्रेशन केले .

कार्यक्रमास गौतमी महिला अँग्रो फुड प्रोडक्टस इंडिया प्रा.लि अध्यक्षा आश्वीनी ताई मस्कर , चेअरमन मनिषा गायकवाड ‘ माझी सैनिक गुलाब करे, श्री वैभवजी गिते, राज्य सचिव एन डी एम जे महा राज्य , जयराम मस्कर , जितेन्द्र गायकवाड ,विजय मस्कर प्रगतशील शेतकरी व मोहन कनवाळू चेअरमन वि का सो लोणी तसेच ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच ‘ प्रतिष्ठीत नागरिक उपस्थितीत होते . कार्यक्रमाचे नियोजन आयोजन विजयकुमार कर्णे कृषि सहाय्यक कारुंडे यांनी मोलाचा वाटा उचलला . अशाप्रकारे गवार लागवड , प्रक्रिया ‘ मुल्यवर्धन, PM FME व स्मार्ट या विषयावरील मेळावा उत्साहात संपन्न झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button