बोरगावचा ढाण्या वाघ शूरवीर क्रांतिकारक आदरणीय बापूबिरु वाटेगावकर…

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.0730 868 448
बोरगाव ता.वाळवा जि. सांगली या गावात एका लहानशा धनगर कुटुंबात जन्माला आलेला अस्सल चोवीस कॅरेट सोनं असणारा रांगड्या मातीतील मर्द गडी म्हणजे आदरणीय समस्त महाराष्ट्राचे लाडके क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय बापूबिरु वाटेगावकर म्हणजेच गोगरिबांचे कैवारी आदरणीय आप्पा. मेंढरं हाकायची काठी सोडून हातात बंदूक धरावी लागली. आणि गावातील अन्याय करणाऱ्या क्रूर प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवावा लागला.
सुखी संसार चालू होता. पण अन्याय अत्याचार पाहवत न्हवता. गावात गुंडांची टोळी होती. त्यांचे म्होरके खूप माजलेले होते. आणि माजलेल्या बोकडाचा माज उतरवायला आप्पा ला चांगलंच जमत होत. अहो, मेंढरं हाकायची घुंगराची काठी सोडून हातात बंदूक उचलली आणि गावासाठी स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून झोकून दिले समाजकार्यात स्वतःला मृत्यूच्या अखेरपर्यंत. ढोल वाजवणारा हात बंदूक घेऊन अन्याय अत्याचाराला गाढण्यासाठी उभा होता. डोक्यावर फेटा, हातात बंदूक, कपाळाला बिरोबाचा भंडारा आणि गळ्यात माळ डोळ्यात अन्याय अत्याचार करणाऱ्या बद्दल राग होता. मनात गोरगरिबांबद्दल कळवळा होता.
बंदूक उचलली ती स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर गावासाठी.गावातील प्रत्येक मायमाऊलीसाठी, गोरगरिबांच्या रक्षणासाठी स्वतःच्या स्वाभिमानासाठी. “एका काठीच्या ठोक्यात मेंदू बाहेर पाडेल…!” अशी शब्दात जरब होती. अहो ज्या माणसाने स्वतःच्या मुलाने परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं म्हणून स्वतःच्या हाताने गोळी घालून मारलं. मग विचार करा तो माणूस असेल कसा. त्या महान क्रांतिकारी माणसाच्या नजरेत न्याय हा सर्वांना सारखाच झाला पाहिजे मग नात रक्ताच असो की, परकं दुसरं कोणी असो. ज्या माणसाला एकण्यासाठी लोक तहान भूक विसरून एखादा सण असल्यासारखे एकत्रित यायचे त्या माणसाला लोक विसरतील तरी कसे ओ. अरे गळ्यात माळ होती मिरचीचे देठ, मेथीची भाजी, पाथरटाची भाजी, कांदा मिरची भाकरी खाऊन दिवस काढले. कधी तो देवमाणूस थकला नाही, अन्याय अत्याचार समोर झुकला नाही.
उन्हवारा पाऊस अंगावर झेलून ज्याने फक्त गावासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. गावातील माजलेल्या गावगुंडांना आपल्या बंदुकीच्या गोळीने कायमच जेरबंद केलं. कित्येक आयाबहिणींची अब्रू वाचवली. कित्येकांचे संसार बसवले, दुसऱ्यांचे वार आपल्या छातीवर झेलले, कित्येकांना आसरा दिला. गावातील गावगुंडांनी त्यांचं घर जाळून टाकलं, त्यांचे सोन्यासारखी मेंढरं घेऊन गेले, त्यांच्या बायका पोरांवर अन्याय केला. त्यांना गावात कोणी पीठ सुद्धा वाढलं नाही. तरीही हा माणूस झुकला नाही, घेतला वसा खाली टाकला नाही, झुंजत राहिला आयुष्यभर झटत राहिला गावाच्या विकासासाठी, गावच्या शांतीसाठी. अहो जाऊन विचारा त्या बोरगावच्या मातीला कसे होते
आदरणीय बापूबिरु वाटेगावकर म्हणजे गोरगरिबांचे कैवारी आप्पा. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त बापूबिरु वाटेगावकर यांचीच चर्चा होती. अनेक मोठमोठे पोलीस विभागातील अधिकारी ही त्यांना पकडू शकले नाहीत. पण त्यांनी व त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या सहकर्यांनी कधीच कोणाला कसलाही त्रास दिला नाही. कोणाच्या वाळलेल्या काडीवर सुद्धा वाईट नजर टाकली नाही. कोण्या मायमाऊली कडे कधी वाकड्या नजरेने पाहिलं नाही. शेवटी सर्व गावगुंडांचा नाश करून गावात शांतता प्रस्थापित करून स्वतःला स्वतःच्या मर्जीने अटक करून घेतली. असे होते आमच्या समस्त संपूर्ण महाराष्ट्राचे शूरवीर क्रांतिकारक आदरणीय बापूबिरु वाटेगावकर म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकांच्या मनातील आप्पा…!
लेखक-महेश बजरंग कोळेकर
रा-काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव.
मो.नं-9146133047



