महाराष्ट्र

खासदार राहुल गांधी यांना सुनविलेल्या शिक्षेच्या निषेधार्ध सोमवारी काँग्रेस आय कार्यकर्त्यांचे जेल भरो आंदोलन, युवा काँग्रेस नेते सुनील बापू सावंत यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

काॅग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर करमाळयात काॅग्रेस पक्षाचे नेते सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दिनांक २७ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जेल भरो आंदोलन करण्यात येणार असुन सर्व काॅग्रेस प्रेमीनी या जेल भरो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन काॅग्रेस पक्षाचे नेते सुनील बापु सावंत यांनी केले आहे

यावेळी पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खासदार राहुल गांधी यांनी चोरी का सर नेम मोदी ही क्यों होता है या वक्तव्यावरून न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे खासदार राहुल गांधी यांना केंद्रातील भा जा प प्रणित मोदी सरकार घाबरत आहे त्यांच्या पायाखालची वाळु घसरत चालली आहें भारत जोडो पदयात्रेमुळे देशातील सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल आपुलकी निर्माण झाली आहे

त्यामुळे भाजप सैरवैर झालेले दिसत आहे आणी म्हणुनच काॅग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारे अडकवण्याचा हां डाव आहे लोकशाही वाचविण्यासाठी न्याय व्यवस्था आबादित राहण्यासाठी सर्व काॅग्रेस प्रेमीनी सोमवारी सकाळी अकरा वाजता जेल भरो आंदोलन सामील व्हावे असे आवाहन काॅग्रेस पक्षाचे नेते सुनील बापु सावंत यांनी केले आहे या दिलेल्या निवेदनावर काॅग्रेस पक्षाचे दस्तगीर पठान फारुक जमादार, औदुबर उबाळे, मझहर नालबंद, संभाजी गायकवाड़ राजेन्द्र वीर सिंकदर सय्यद राजेन्द्र कसाब आदी च्या सहया आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button