अकलुज च्या शंकरराव मोहिते महाविद्यालय
राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून “सायबर क्राईम” या विषयात जनजागृती .

उपसंपादक——-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे यामध्ये सामान्य नागरिक विद्यार्थी यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे हे थांबवण्यासाठी व त्या विषयात त्यांना जागृत करण्यासाठी आज दिनांक 25 मार्च 2023 रोजी शंकराव मोहिते महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सायबर क्राईम जनजागृती कॅम्पियन चालवण्यात आले यामध्ये महाविद्यालयातील वेगवेगळे विभाग, ग्रंथालय व महाविद्यालय बाहेरील असलेले गाळेधारक यांच्यामध्ये माहितीपत्रक माध्यमातून जनजागृती करण्यात आली

खालील मुद्द्याद्वारे जनजागृती करण्यात आली
१) ओटीपी कुणालाही शेअर करू नये
२)आपली गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये
३)व्हाट्सअप वर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक ला क्लिक करू नये
४)एटीएम पिन अकाउंट नंबर आयएफसी कोड कुणालाही सांगू नये
या उपक्रमामध्ये सत्यजित चव्हाण, हितेश पुंज , नीलम कांबळे, विनायक मंडले,प्रतिक फुले ,शिवराज माने देशमुख, चंद्रकांत गायकवाड ,ऋत्विक इंदुलकर नीलम कांबळे, ओंकार कोळी , वैभव स्वामी, शंभूराजे काळे, रणजीत फडतरे ,गणेश मोरे,इत्यादी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला

या उपक्रमासाठी स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे सर तसेच विभागीय समन्वयक डॉ. चंकेश्र्वर लोंढे सर,कार्यक्रम आधिकरी डॉ.दत्तात्रय मगर सर, डॉ.सविता सातपुते मॅडम, डॉ. सज्जन पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.



