शहर

म मराठी चा २०२३ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार महेश कोळेकर यांना प्रदान .

उपसंपादक——-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

तुळजापूर- दिनांक २३ मार्च २०२३ रोजी तुळजापूर येथे म मराठी चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला. विवीध क्षेत्रातील मंडळींनी यावेळी हजेरी लावली होती. तुळजापूर आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील कला,क्रीडा,सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक,राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणिजनांचा हा पुरस्कार देण्यात आला.

यामध्येच काक्रंबावाडी ता.तुळजापूर जि. धाराशिव येथील एका अत्यंत गरीब कुटुंबात राहणाऱ्या पण सतत काहींना काही विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि देशाच्या प्रगतीसाठी सतत झटणाऱ्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्याय,अत्याचारावर पेटून उठणाऱ्या महेश बजरंग कोळेकर यांना या वर्षीचा मानाचा म मराठी चा उत्कृष्ट सामाजिक कार्य हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी हा पुरस्कार वितरण समारंभास विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते. आज त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र भरातून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button