गारपिट ग्रस्त शेतकऱ्यांना पर एकरी ५०,०००, रुपयेची तत्काळ मदत करावी युवासेनेची मागणी

उपसंपादक—- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
युवासेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके डॉ निलेश कांबळे दत्ता साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली गारपिट ग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना ५०,००० रुपये मदत करावी अशा आशयाचे निवेदन माळशिरसचे तहसीलदार तुषार देशमुख यांना देण्यात आले
माळशिरस तालुक्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट अवकाळी पाऊस होऊन शेतकऱ्यांचा हरभरा, गहू ,मका ,द्राक्षी, लिंबू, कलिंगड, खरबूज , भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारा पाऊस झाल्याने तोंडावर आलेल्या पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनचे पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक स्वरूपात मदत प्रत्येक एकरी ५०,००० रुपये करावी . पिंकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यां समोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. आधीच तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

शेती पिकांसाठी काढलेला कर्ज शेतकरी परतफेड कशी करावी या चिंतेत पडलेला आहे. वादळीवारा, अवकाळी पाऊस व गारपीट होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांना अजूनही आधीचे अनुदान अद्यापही मिळालेला नसतांना हा अचानकपणे आलेला गारपीट व अवकाळी पाऊसाचे संकट हे शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. यात प्रामुख्याने अजूनही पाऊसाचा अंदाज दर्शविला जात असून शेतकऱ्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे.
अवकाळी वादळी वारा, गारपीट व पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचा शासनाने पाहणी करून शेतकऱ्यांवर आलेल्या संकटातून सावरण्यासाठी तात्काळ पंचनामे करून आर्थिक प्रत्येक एकरी ५०,००० रुपये तत्काळ मदत करावी अशी मागणी ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाकडून करीत आहे यावेळी युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे शिवसेना अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे पी व्ही कुलकर्णी लक्ष्मण डोईफोडे बाबुलाल तांबोळी संतोष मोटे विकास भोई ई शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.



