महाराष्ट्र

पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करावेत खासदार ओम दादा राजे निंबाळकर यांची मागणी

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448


पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतीपीकाचे प्रशासनांने तातडीने पंचनामे करावेत- अशी मागणी धाराशिव चे खासदार ओमप्रकाश दादा राजेनिंबाळकर यांनी धाराशिव चे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. निवेदनाद्वारे केली आहे

धाराशिव लोकसभा मतदारसंघात मागील 2 दिवसांपासून अनेक महसुल मंडळामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, व सोसाट्याचा वारा यामुळे जिल्ह्यातील काढणीस आलेली ज्वारी, गहु, हरभरा, कांदा, द्राक्ष, आंबा व फळपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त होत आहेत.
त्या अनुषंगाने धाराशिव मतदारसंघातील अवकाळी पाऊस, गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतीपीकांचे व फळपीकांचे प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेशित करावित अशीही मागणी निवेदना द्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button