महाराष्ट्र

अलीम्को (ALIMCO) कॅम्पमध्ये,संग्रामनगर (माळीनगर) शाळेस माॅडीफाय चेअर चे वाटप…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अलीम्को (ALIMCO) च्या कॅम्प मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संग्रामनगर (माळीनगर) येथील विद्यार्थी रेणू धुळदेव चोरमले व संदीप धुळदेव चोरमले या दिव्यांग विद्यार्थ्यांना माॅडीफाय चेअर चे वाटप माळशिरस तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकामनोज राऊत व गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे,विस्तार अधिकारी स्वरा महामूनी यांच्या मार्गदर्शनाखाली वाटत करण्यात आले…

समावेशित उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर भत्ता वाटप, श्रवणयंत्राचे वाटप,व्हील चेअर, माॅडीफाय चेअर,आदिंचे वाटप करण्यात येते…
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समावेशित उपक्रमाचे (BRC)चे तज्ञ गणेश घुगे,विषय तज्ञ व शिक्षक अश्विनी वनारसे,भारती बनसोडे,सारीका पाटील,बालाजी लेकुरवाळे,संतोष चौगुले,आदिंनी परिश्रम घेतले…
समावेशित उपक्रमाचे आभार माळीनगर ग्रामपंचायत सरपंच अनुपमा एकतपुरे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ पुजा लोखंडे,शिक्षक युन्नूस तांबोळी,विनोद थोरात यांनी मानलें…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button