महाराष्ट्र

अकलूजच्या “एकता” बहुउद्देशीय संस्थेने केला अकलूज आणि परिसरातील डॉक्टर,वकील,इंजिनियर,पोलिस आणि शासकीय सेवेत सेवा देणाऱ्या मुस्लिम समाजातील सर्व गुणवंतांचा सन्मान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

“अजातशत्रू” नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील,”देवमाणूस” डॉ एम के इनामदार,किशोरसिंह माने पाटील यांच्या सह “युवा नेते” सयाजीराजे मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती…

सबंध जगा मध्ये 05/09/2025 रोजी मोठ्या उत्साहाने साजरी होणाऱ्या “पैगंबर जयंती” च्या निमित्ताने अकलूज येथील “एकता” बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अकलूज आणि परिसरातील डॉक्टर,वकील,इंजिनियर,पोलिस आणि शासकीय सेवेत सेवा देणाऱ्या मुस्लिम समाजातील सर्व गुणवंतांचा सन्मान कृष्णप्रिया मल्टिफंक्शन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता…

सदरच्या कार्यक्रमास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या सह “देवमाणूस” डॉ एम के इनामदार,अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,मा सौ देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील,”युवा नेते” सयाजीराजे मोहिते पाटील,ॲड दिलीप फडे,संग्रामनगरचे माजी सरपंच कमाल शेख,ॲड वजीर शेख,हाजी आदमभाई तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती…

कार्यक्रमाच्या सुरुवातीस “एकता” बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जावेद (बाबा) तांबोळी यांनी छोटेखानी प्रास्ताविक सादर केले,तद्नंतर आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान “एकता” संस्थे मार्फत करण्यात आला…

या नंतर अकलूज आणि परिसरातील डॉक्टर,वकील,पोलिस,इंजिनिअर आणि शासकीय सेवेत सेवा देत असलेल्या मुस्लिम समाजातील बंधू आणि भगिनींचा आदर सत्कार करण्यात आला,सरते शेवटी “एकता” बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जावेद (बाबा) तांबोळी यांचा सन्मान “अजातशत्रू” नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला…

सदरच्या कार्यक्रमासाठी अकलूज आणि परिसरातील अनेक नागरिकांसह सलीमखान पठाण,रफिकभाई पठाण,”युवक मित्र” जुल्करभाई शेख,आसिफ खुदाबक्ष तांबोळी,अकबरभाई तांबोळी,असलमभाई तांबोळी,छोटा हमीद मुलाणी आणि मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक रशीदभाई मुलाणी उपस्थित होते,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी “एकता” बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button