नव बौद्धांच्या विरोधात चाललेली भाजपा ची चाल ओळखा ,,,,,!

ॲड.अविनाश, टी, काले अकलूज ता.माळशिरस जि. सोलापूर , डॉ आंबेडकर चौक ,
मो न 9960178213
माळशिरस तालुका विधानसभा राखीव आ राम सातपुते यांनी विधान सभेत केलेली मागणी व त्यांचे नंतर बहुजन हिंदू मोर्चा चे अध्यक्ष व भंडारा राखीव मतदार संघाचे
आ नरेंद्र भोंडेकर यांनी आरक्षणातील “अबकड” वर्गीकरणांची मागणी करताना 58जाती वर 75वर्षापासून अन्याय होत आहे असे केलेले वक्तव्य पाहता अधिक सतर्क आंबेडकरी समाजाने होण्याची गरज आहे ,
हिंदुत्व वाद्यांची नेहमीच एक अडचण आहे ती म्हणजे हिंदुत्वाच्या आधारे समग्र समाजाला एकजूट करून त्यांची समूह शक्ती उभी करणे जी बाब हिंदू राष्ट्र निर्मिती साठी आवश्यक आहे ,
हिंदू मध्ये हजारो जाती चे समूह असून प्रत्येक जात ही स्वतंत्र आणि स्व हित बांधिलकी मानणारी आहे
त्यांना कितीही एकजूट केले तरी त्यांचे विखुरणे चालूच राहते , जसे की लहान मुलाच्या तळहाताच्या मुठीत न मावणाऱ्या गोट्यांचा ढीग दिला तर कांहीं गोट्याच तो पकडू शकतो बाकीच्या निसटून जातातच
हिंदू मधील सर्वोच्च लाभाचे धनी उच्च तीन वर्णाचे लोक असले तरी ही सत्ता कोणाच्या हातात असावी?याचा ही संघर्ष अटळ आहे , यातूनच गैर ब्राम्हणी चळवळ विकसित झाल्या व तश्या वैचारिक मांडणी अजून ही केल्या जातात ,
आज महाराष्ट्रात शिवसेना (ठाकरे )आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वैचारिक मांडणी त्याच आधारे जात आहे
असो परंतु आज तो आपल्या चर्चेचा भाग नाही ,
हिंदू ना एक सूत्रात ठेवणे आणि व्यक्तिगत जाती अस्मिता त्यागून एक संघ बनवण्यासाठी आंतरिक प्रेरणा कमी पडतात व त्यावरील उपाय म्हणून एक तर त्यांना राष्ट्र भक्ती चां आधार घ्यावा लागतो , इतरांना राष्ट्र द्रोही ठरवावे लागते ,
दुसरे हिंदू संस्कृती वर आक्रमण होत आहे आणि हिंदू संस्कृती व हिंदू नष्ट होण्याच्या प्रक्रियेत आहे , कारण त्यांचे शत्रू हे पर धर्मीय असून त्यांची लोकसंख्या वाढत आहे , ते अतिरेकी आहेत , इत्यादी भीती प्रक्षेपित करावी लागते आणि या साठी बहुतेक दा (मुस्लिम भयगंड )निर्माण केला जातो हिंदू चां हा सागर सारखा ढवळंत ठेवावा लागतो , व भले ही हिंदू तील आरक्षित वर्गात एस सी , एस टी , ओबीसी असे वर्ग असले तरी ही ते सुध्दा वर्ग म्हणून एकत्रित येऊ नयेत म्हणून प्रत्येक जातीला स्वतंत्र फायदे आणि अलग झाल्यास आरक्षणातील स्वतंत्र वाट्याचे आमिष दर्शवणे ही त्यांची व्यावहारिक गरज असते
आज ठाकरे यांची शिवसेना भले ही पुरोगामी मोडवर असेल आणि प्रा सुषमा ताई अंधारे यांच्या झंजावाता ने मुळात असलेली सहानुभूती कैक पटीने त्यांचे बाजूने झुकलेली असली तरी ही आम्हाला शांत राहून सर्वांचेच परीक्षण करावे लागते , चिकित्सा हा आंबेडकरी चळवळीचा पाया आहे , आम्ही मेंढरे नाही आहोत की कुणी ही यावे आणि आम्हाला कळपात ओढून न्यावे
भाजपाला हरवण्या चे सुप्त इच्छेने अनेक पुरोगामी आंबेडकर वाद्यांना ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेबांनी स्वतंत्र लढल्याचे दुःख होते आणि त्यांचे मनात शंका निर्माण होते की ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब अप्रत्यक्ष रीत्या भाजपला मदत तरी करीत नाहीत काय?
मी आपल्या पासून हे लपवू इच्छित नाही की , अश्या चर्चा जेंव्हा माझ्या कानावर आल्या.
विशेषतः माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आणि उपरा कार आ लक्ष्मण राव माने यांचे सारखी माणसे वंचित मधून बाहेर पडली तेंव्हा त्यांनी केलेल्या विधाना मुळे माझी ही मनो धारणा तशीच बनलेली होती
मी चळवळीत असलो तरी माझा अनुभव व ज्ञान हे आदरणीय ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेबांच्या पायाच्या धुली कणा इतके ही नाही , मीही सर्व सामान्य आहे , आणि संसदीय राजकारणात अजून काठावरच उभा आहे ,
साहेबांचा अनुभव प्रत्यक्ष आहे आणि ते सर्व राजकारण जाणतात .पवार साहेब हे भाजपा चे पूरक आहेत या स्टेटमेंट ने मला ही धक्का बसला होता , आणि म्हणून पवार साहेब व राष्ट्रवादी प्रेमाचा चष्मा बाजूला ठेऊन कांहीं अभ्यास करावा अस वाटल माझ्या हातात डॉ बाळ अनंत कांबळे यांनी महाराष्ट्रातील राखीव जागा आणि विविध पक्षाच्या भूमिका याचे विश्लेषण करणारा प्रबंध जो 177पानाचा आहे , रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत चे राज्यशास्त्र विभाग प्रमुखांना त्यांनी तो सादर केला होता व त्यात 1962ते 2009पर्यंत चे घडामोडी वर प्रकाश टाकलेला आहे तो प्रबंध इंग्रजीत आहे ,
Perfoance of scheduld cast membars of differnt political parties in Maharashtra vidhansabha elected Frome reserved contitunces
या नावाचा हा प्रबंध आहे त्याच्या पान क्रमांक 29वर ते लिहितात
“There are many differences among this 59 backward classes (i e S C).
A kind of compitition and jealousy among all this castes
Dispute social backwardnes, the integration is not seen
या 59जाती समूहात बरेच भेद असून स्पर्धा आणि असूया या भावनेने पछाडल्याने व सामाजिक दृष्ट्या ते मागास असल्याने त्यांच्यात एकात्मता आलेली दिसून येत नाही याच पायावर भाजपा आणि शिवसेना पक्षा ने 1980पासून नवबौध्द समाजाचे विरोधात इतर हिंदू दलितांना संघटित करण्याचा प्रयत्न केला
On this background Shivsena and BJP tried to organize other Hindu Dalits by opposing Nav Boudhas after 1980
याचे ही पुढे जाऊन ते लिहितात शिवसेना पक्षाने तीन “म”विरोधात धोरणे आखली ज्यात एक” म “महार होता
Shivsena impemented the policy of opposing three “M”s one o those “M”is Mahar.
All reserved places are occupied by Mahar was their mouthpiece to attract non Mahar
सर्व राखीव जागांचा फायदा हा फक्त महार समाजाने घेतलेला आहे या त्यांच्या तोंडी प्रचाराने गैर महार हिंदू दलितांना स्वतः कडे आकृष्ट करून घेतले 1995साली याचा फायदा भाजपा शिवसेनेला झाला 1990साली ज्या जागेवर नवबौध्द उमेदवार निवडून आले होते ते किंवा एक ही नवबौध्द उमेदवार 1995साली निवडून आला नाही धारावी , कळंब, देवळाली, उत्तर सोलापूर अश्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले परंतु त्यात एक ही नवबौध्द नव्हता शिवसेनेच्या पाठिंब्या आधारे भाजपा चे हिंदू दलीत चाळीसगाव, नागपूर, केज , पर्वती, वाशिम, तिरोडा , हेर, कर्जत येथे आले ज्यात नवबौध्द एक ही नव्हता
38%भाजपा , 22%शिवसेना 17%काँग्रेस 6%इतर
काँग्रेस पक्षाचे ही नागपूर , जत, वडगाव या ठिकाणी उमेदवार हे निवडून आले त्यात नवबौध्द नव्हते
1999साली राष्ट्रवादी ची स्थापना झाल्या नंतर प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे , यांनी बहुजन रयत परिषद स्थापना करून मातंग समाजाचे एकीकरण करण्यावर भर दिला डॉ विमल मुंदडा , तुकाराम तुपे व स्वतः ढोबळे सर हे आमदार म्हणून निवडून आले केज, मंगळवेढा स्वतः पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केले होते की नव बौद्ध समाजाचा उमेदवार जनता स्वीकारत नाही,,
पण ती का स्वीकारत नाही?याचे विश्लेषण करण्याचे त्यांनी जाणीव पूर्वक टाळले आज राष्ट्रवादी तरी नवबौध्द समाजाचे बाबतीत कोणती भूमिका घेते ?
मोहोळ , फलटण , माळशिरस राखीव मतदार संघ असताना राष्ट्रवादी काँग्रेस ने नवबौध्द उमेदवार कधी दिला आहे काय?याचे उत्तर नकारार्थी च आहे ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ते खरेच आहे , स्वतः चा पक्ष सोडून जे मागासवर्गीय प्रस्थापितांच्या वळचणीला उभे राहून ओंजळी ने पाणी पिण्याचा व स्वतः चा उध्दार व विकास होईल अशी कामना करतात ते मूर्ख स्वतः सह समाजाचा ही विनाश करतात म्हणून आंबेडकरी समाजाला माझी हात जोडून विनंती आहे आत्मपरीक्षण करा ,
भाजपा ने काश्मीर मध्ये मुफ्ती मेहबूबा यांचे समवेत युती केली होती परंतु त्यांनी त्यांची विचारधारा समर्पित केली नव्हती ,,,कोणत्याही प्रस्थापित पक्षाने आपल्या मुक्ती साठी लढा दिला नव्हता , ही बाब विसरू नका
आज ज्यांना आपण हिंदू दलीत आहोत याचा अभिमान वाटतो त्यांनी ही आत्मपरीक्षण करावे , महाड चे चवदार तळे याचा सत्याग्रह करण्या पूर्वी व अस्पृश्यता कायद्याने गुन्हा ठरवण्या पूर्वी तुम्ही सवर्ण समाजाच्या विहिरीवर पाणी भरू शकत होता काय?
गावात रामायण पोथी चालू असताना तुम्ही मंदिरात बसू शकत होता काय?अजून तरी सर्व मंदिरे तुमच्या साठी सन्मानाने खुली आहेत काय?तुमच्या बाबतीत भेदभाव केला जातो असे तुम्हाला जाणवत नाही काय?
क्रांतिकारी लेखक , लोक शाहीर , अण्णा भाऊ साठे यांना शाळेत गुरुजींनी प्रेमाने जवळ बसवून घेतले होते काय?याची प्रामाणिक उत्तरे मनाशी शोधा ,
ज्यांनी जात पात मनात न आणता तुमच्या आमच्या मुक्ती साठी जीवघेणा संघर्ष समग्र हयात भर केला त्या डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना माना किंवा न माना पण किमान कृतज्ञता तरी बाळगा ,
संभाव्य निवडणुका जवळ आल्या की प्रत्येकाच्या जातीय हिताचे घोषणापत्र निर्माण करायचे आणि आम्ही तुमच्या समाजाला दिले म्हणून कागदी घोडे नाचवून तुमच्या मताचे आधारे सत्ता निर्माण करायची हे खेळ कधी तरी समजून घ्या,,,!आपल्याला आपली सत्ता हवी आहे , मराठा , माराठेतर , ब्राम्हण ब्राम्हणेतर हे खेळ पुरे झाले , शरद चंद्र जी पवार साहेब आणि ना नितीन जी गडकरी एका स्टेज वर येतात तेंव्हा पुणेरी किंवा पेशवाई पगडीचा वाद नसतो या तात्विक लुटुपुटू चे लढाई पासून दूर रहा , समग्र उपेक्षित , सत्ता वंचित समाजाची सत्ता आणा , लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्यात आपल्या जागांचे वाटप करा ,
जे खरोखर पुरोगामी असतील ते उच्च वर्णीय , क्षत्रिय , वैश्य , आणि ब्राम्हण ही असतील ते त्यांचेतील अभिमान आणि दर्प बाजूला ठेऊन आपल्या समवेत येतील एस सी एस टी , ओबीसी , आणि अल्पसंख्यांक व गरीब मराठा , धनगर साळी माळी कोळी कुणबी सगळे एकत्रित येऊया आणि घराणे शाही ची मक्तेदारी मोडीत काढून टाकूया
भाजपा ही नवबौध्द समाजाचे विरोधात आहे हे डोक्यातून काढून टाका , दोन दोन राज्य सभा खासदार त्यांनी बनवले च नसते , पक्षीय राजकारणात शक्ती ला महत्व असते फक्त त्यांची भीती दाखवून किंवा अधिक फायद्याचे गाजर दाखवून त्यांना वंचितांची एकी होऊ द्यायची नाही ,,नव बौद्धांच्या विरोधात चाललेली भाजपची चाल ओळखा , व एकजुटीने ऍड प्रकाश जी आंबेडकर यांच्या माध्यमातून प्रस्थापित राजकीय शक्ती चे विरोधात स्वाभिमानी लढे देऊ



