महाराष्ट्र

पिंपरी बुद्रुकचे ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या ऊरूसानिमीत्त दर्गाहवरती आकर्षक विद्युत रोषणाईची तरूणाईला पडली भुरळ, फोटो व व्हिडिओ काढण्यात तरूणाई व्यस्त.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी,
मोबाईल – 8378076123

पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) गावचे ग्रामदैवत पिरसाहेब ( उदगीरबाबा ) यांचा सालाबाद नियमाप्रमाणेच्या ऊरूसास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने दर्गाहवरती आकर्षक, मनमोहक अशा पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याची भुरळ तरूणाईसह अबालवृद्ध, महिला व बालकांना पडली आहे.


आज सोमवारी सायंकाळी नऊ वाजता ग्रामस्थांच्या वतीने संदलची सामुहिकरित्या गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून ती पिरसाहेबांच्या मजारवर चढवण्यात येणार आहे. ऊरूसानिमीत्त गावात स्वच्छता करण्यात आली असून गावाच्या सार्वजनिक खांबावर बल्ब बसवून गाव चकमक चमकवण्यात आले आहे.

तसेच पिरसाहेबाच्या मजारसह दर्गाहवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळी दर्गाह परीसर विद्युत रोषणाई मुळे झगमगून गेले आहे. ग्रामस्थांसह परीसरातील तरूण या आकर्षक विद्युत रोषणाईचे फोटो व व्हिडिओ काढण्यात मग्न झाले आहेत.

यात्रेनिमित्त खेळणी, फुगेवाले, बांगडी दुकाने, आईस्क्रीम, पायनापल, मेवा मिठाईची दुकाने थाटण्यात सुरूवात झाली आहे. मागील चार वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमताच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊरूस भरणार असल्याने सर्वत्र उत्साह पहावयास मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button