शहर

विरार मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील (22) वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून आरोपी आठ दिवसापासून फरार

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यात विनयभंग आणि बलात्काराच्या घटना ताज्या असताना विरार मांडवी पोलीस ठाणे हद्दीत होळीचा सण साजरा करण्यासाठी माहेरी आलेल्या एका (22) वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून रात्रीच्या पहारी तिला उचलून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरार खार्डी गावातील दोन तरुणांना या महिलेच्या नातेवाईकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता ते घटनास्थळावरून फरार झाले आहेत ते आजपर्यंत एक आठवड्यापासून फरार आहेत. या दोन फरार आरोपींचा विरार मांडवी पोलीस ठाण्याचे पीएसआय तळघरे आणि पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कसून शोध घेत आहेत. अशी माहिती पीएसआय तळघरे यांनी दिली. परंतु हे आरोपी गावातच फिरत असल्याचीही गोपनीय माहिती देखील तिच्या नातेवाईकांनी पीडित मुलीच्या आई वडिलांना दिली आहे.


सासर वज्रेश्वरी तालुका भिवंडी येथील 22 वर्षीय विवाहित महिला रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी होळी सणाच्या निमित्ताने तिच्या माहेरी म्हणजे विरार खार्डी गावात तिच्या नवऱ्यासोबत आली होती होळीच्या दिवशी तिच्या वडिलांच्या घराशेजारी लावलेल्या होळीवर ती एकटी रांगोळी काढत असताना खार्डी गावातील दोन इसम तिच्या पाठीमागून आले व तिच्या छातीला हात लावत असताना तिने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता या दोघांनी तिला शिवीगाळ करून तुला उचलून घेऊन जाऊन मजा करतो असे अशील भाष्य केल्यावर या महिलेने आरडाओरड केल्यावर तिचे वडील व आई घटनास्थळी येऊन या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हे दोघेही घटनास्थळापासून फरार झाले आहेत या घटनेबाबत या 22 वर्षीय विवाहित महिलेने विरार मांडवी पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी तक्रार दिल्यावर मांडवी पोलीस ठाण्याचे पीएसआय तळघरे यांनी या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.हे आरोपी सध्या फरार आहेत त्यांचा आम्ही कसून शोध घेत आहेत अशी माहिती टाईम्स नाईन न्यूज मराठी चॅनला पीएसआय तळघरे यांनी दिली असून पीडित मुलीच्या गावातील नातेवाईकांनी हे आरोपी गावातच फिरत असल्याची गोपनीय माहिती तिच्या आई-वडिलांना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button