शहर

दहिवली ता. माढा येथील तलाठी सहदेव शिवाजी काळे ला 10,000 रु.ची लाच स्वीकारताना अँन्टी करप्शन च्या जाळ्यात

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448.

जनशक्ती संघटनेचे संपर्क प्रमुख गणेश वायभासे यांच्या शेताचे वाटप पत्र करायचे असले मुळे गणेश वायभासे हे दहिवली, तालुका माढा येथील तलाठी  सहदेव शिवाजी काळे वय 54 वर्ष व्यवसाय नोकरी पद तलाठी सज्जा कार्यालय दहिवली तालुका माढा यांच्याकडे गेले.आणि माझी जमिनीचे वाटप पत्र करायचे आहे असे सांगितले.असता तलाठी सहदेव शिवाजी काळे यांनी या कामासाठी प्रथम  ३५०००(पस्तीस हजार)रुपये खर्च लागेल असे सांगितले.नंतर30,000 रुपये देण्याचे ठरले ठरल्याप्रमाणे आज १०,०००( दहा हजार रुपये) देण्याचे ठरले असताना.

जनशक्ती संघटनेचे गणेश वायभासे यांनी अँटी करपशन बुरो सोलापूर च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि आज दिनांक १३/०३/२०२३ रोजी सापळा रचला.ठरल्याप्रमाणे सकाळी ११ वाजेपासून सापळा रचला गेला आणि ३:३० मिनिटांनी दहीवली ,तालुका माढा चे तलाठी  सहदेव शिवाजी काळे यांना त्याच्या स्वतः च्या राहत्या घरी म्हणजे कुर्डुवाडी तालुका माढा येथून १०,००० रुपये ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग सोलापूर यांच्याकडून  रंगे हात पकडण्यात आले. असून पुणे परिक्षेत्र सोलापूर युनिट कडून कुर्डूवाडी पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7   प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे

यामध्ये मार्गदर्शन आधिकारी म्हणुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक – आमोल तांबे , अप्पर पोलीस अधीक्षक- सुरज गुरव पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपाधीक्षक- गणेश कुंभार सापळा पथक म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी ,सोलापूर पोलीस अमलदार- पकाले, जाधव, सण्णके ,सुरवसे , सर्व ॲन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी कामगिरी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button