महाराष्ट्र

मनुष्याच्या मनातील उच्च विचारच वर्तमानातून भविष्याचा वेध घेत असतात – व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड.

उपसांपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

दिनांक ९/३/२३ रोजी वाघोली (बलभीमराव शेंडगेवस्ती) ता. माळशिरस येथे सकाळी ११ वाजता कै. बलभीमराव शेंडगे यांच्या २३ व्या स्मृती दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत चंद्रशेखर गायकवाड “वर्तमानातून भविष्याचा वेध “या विषयावरती
व्याख्यान करताना म्हणाले ” मनुष्याच्या मनातील उच्च विचारच वर्तमानातून भविष्यचा वेध घेत असतात.

तुम्ही मोठी स्वप्ने ठेवा स्वप्नांना कृतीची जोड
द्या.मोठे ध्येय ठेवा ध्येयपूर्तीसाठी जिद्द
चिकाटी ,आत्मविश्वास ,परीश्रम, मेहनत करीत रहा.उद्याचा भविष्यकाळ उज्वल आणि भव्य असेल.कै बलभीमराव शेंडगे म्हणजे माळशिरस तालुक्याला लाभलेले एक मौलिक मौल्यवान रत्न असुन कै बलभीमराव शेंडगे यांनी १० वर्षे वाघोली गावाचे सरपंचपदावर असताना शेतकरी ,कष्टकरी ,
विद्यार्थी यांच्यासाठी आपले जीवन वाहून घेतले होते.

कलाकारांच्या कलाकौशल्यास वाव दिला होता त्यांनी आपले जीवन समाजसेवेसाठीच वाहून घेतले होते.त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून माजी मुख्यकार्यकारी अधिकारी भारत शेंडगेसाहेबांनी समाजसेवेच चक्र गतिमान केले आहे.आजच्या विद्यार्थी आणि युवाशक्तीने हे आयडाँल डोळ्यासमोर ठेवले पाहिजे” असे विचार व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांनी सांगितले .यावेळी सोलापूर जिल्हा परीषद माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते – पाटील उपस्थित होते.

यावेळी मोफत आरोग्य निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.तसेच भजन आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास माणिकराव मिसाळ, भगवानराव मिसाळ ,कालिदास मिसाळ , राजेंद्र काळे धोंडीराम मुळे विष्णू मिसाळ हरिदास पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमास
वाघोली आणि परीसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button