महर्षी संकुलात ग्राम सुरक्षा यंत्रणा जनजागृती उपक्रम संपन्न

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी
ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे चोरी व दरोडा यांना आळा बसू शकेल..गणेश लोकरे, वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा सोलापूर.शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित, महर्षी संकुल यशवंतनगर येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा जनजागृती उपक्रम पार पडला. सोलापूर ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशालाचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलात ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापराबाबत जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी विक्रम सिंह घाटगे जिल्हा समन्वयक ग्राम सुरक्षा यंत्रणा, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, गणेश लोकरे ग्रामसुरक्षा यंत्रणा वरिष्ठ विभागीय अधिकारी सोलापूर हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने पार पडला.
गणेश लोकरे ग्रामसुरक्षा यंत्रणा वरिष्ठ विभागीय अधिकारी सोलापूर मार्गदर्शन करताना म्हणाले ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबवल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. आपत्कालीन स्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास एकाच वेळी गावातील सर्व नागरिकांशी संपर्क कसा साधता येईल हे प्रात्यक्षिकातून दाखवले.



