विशेष

खंडाळी येथील खुन प्रकरणातील मुख्य आरोपी नारायण पताळे याना जामीन मंजुर

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

खंडाळी येथे झालेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी नारायण पताळे यांना जामीन मंजूर झाला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि खंडाळी येथे दि 19/11/2022 रोजी पूर्ववैमनस्यातून कळशी फेकून मारलेचा राग मनात धरून रामचंद्र पताले यांचा पाण्याच्या दंडा मध्ये पालथे पाडून मानेवर पाय देऊन श्वास कोंडून नारायण पताळे याने खून केल्याचा आरोप सरकारी पक्षा तर्फे ठेवण्यात आला होता

तर आरोपी तर्फे वकील ॲड. सागर जाधव यांनी आरोपी याने कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही, पोस्ट मर्टॉम् रिपोर्ट मध्ये मेंदूतील रक्त स्राव झाल्याने मृत्यू झाला असल्याचे तसेच प्रथम दर्शनी साक्षीदार यांच्या जबाबात असणारी तफावत हे मुद्दे व असे अनेक मुद्दे युक्ती वाद करून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

युक्ति वादातील सर्व मुद्दे लक्षात घेता माळशिरस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एन.पाटील यांनी आरोपी नारायण पताले याचा जामीन अर्ज मंजूर केला
यावेळी सरकारी पक्षा तर्फे ॲड ढवळे यांनी काम पाहिले तर आरोपी तर्फे ॲड. सागर जाधव ॲड विपुल पवार व ॲड महादेव पवार यांनी काम पाहिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button