शहर

भाजपाचे माजी आमदार उत्तमरावजी इंगळे यांचा धुमधडाक्यात वाढदिवस म्हणजे लोकसभेच्या उमेदवारीचे संकेत!-विलासभाऊ चव्हाण

प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ

दिनांक 5/3/2023 उमरखेड-महागांव विधानसभेचे भाजपचे लोकप्रिय माजी आमदार उत्तमरावजी इंगळे यांचा वाढदिवस चार मार्च 2023 रोजी धुमधडाक्यात उमरखेड व महागाव येथे भाजपा नेते व कार्यकर्त्याकडून धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

धुमधडाक्यात साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसा वरून येणाऱ्या आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात उत्तमरावजी इंगळे यांना भाजपा कडून उमेदवारी देण्याचे एक प्रकारचा संकेतच भाजपा नेत्यांनी दिल्याचे दिसून येत आहे.

त्याचे कारण असे की भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा व उत्तमराव इंगळे यांच्यामध्ये तेवढे काही जमत नसल्याच्या चर्चा नेहमीच ऐकायला मिळत होत्या परंतु उत्तमराव इंगळे यांचा वाढदिवस भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शहरात धुमधडाक्यात साजरा केला इतर अनेक सर्व पक्षातील नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी देखील उत्तमराव यांचा वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाला विशेष करून माजी आमदार राजेंद्र नजरधने दिवसभर हजर होते.त्यांनी महागाव येथे ही उत्तमरावजी यांचा वाढदिवस आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह अतिशय उत्साहात साजरा केला त्यानंतर ते उमरखेड येथिल कार्यक्रमात दिवसभर हजर होते

उत्तमराव इंगळे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे कुशल नेतृत्व आहे.भाजपात असल्यानंतरही कुण्या राजकीय पक्षाचा त्यांनी कधी द्वेष केला नाही.समारील व्यक्ती हे कोणत्याही समाजाचे किंवा धर्माचे असो त्याचं काम उत्तमरावजींनी नक्कीच केले किंवा निदान करण्याचा प्रयत्न तरी केला.असे सर्वांना चालणारे नेते भविष्यात हिंगोली लोकसभेचे खासदार झाले तर सर्वांना आनंदच होईल त्या दृष्टीने भाजपाचा प्रयत्न जर असेल तर त्या प्रयत्नाचे स्वागत सर्व जनता करील!

उमरखेड विधानसभेतील कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आजपर्यंत हिंगोली लोकसभेची उमेदवारी मिळाली नव्हती तो योग जर उत्तमरावजी इंगळे यांच्या माध्यमातून उमरखेडला आला तर त्याचे स्वागत उमरखेड- महागावची जनता नक्कीच करेल!

उत्तमरावजी इंगळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! त्यांना सुख समृद्धी व दीर्घायुष्य लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे टाईम्स 9 मराठी न्युजसी बोलतांना जय राज सिंहासनचे संपादक विलासभाऊ चव्हाण यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button