महाराष्ट्र

सुरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांचा मोठा प्रतिसाद

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबा- 8378076123

प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा,ग्रामपंचायत सुरवड व आरोग्य उपकेंद्र सुरवड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी व इतर सामान्य आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

  ग्रामपंचायत सुरवड व आरोग्य उपकेंद्र सुरवड यांच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणीत अनेकांना औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये १७६ पुरुष, महिला व बालके यांच्या तपासण्या करण्यात आल्या. तर १५३ जणांचे एक्स-रे काढण्यात आले. 

सदर शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ताटे व डॉ. ज्ञानेश्वर बाहेगावकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच सहदेव मोहिते, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, रणजीत खेडकर, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सागर शिंदे, क्ष-किरण तंत्रज्ञ तसेच स्मीअर पॅथॉलॉजी टीम इंदापूर आदींनी ग्रामस्थांच्या तपासणी केल्या. या शिबिरासाठी श्रीमती कल्पना बुधावले आरोग्य सेविका, बाबासाहेब मोरे आरोग्य सेवक, आशासेविका रूपाली पांढरे, सुलोचना बनसुडे, अर्चना माने, संगीता फलफले, सीमा तिकोटे आदींनी परिश्रम घेतले. तर सरपंच सौ.योगिता शिंदे, ग्रामसेवक प्रल्हाद आबनावे सर्व सदस्य व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत सुरवड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button