अकलुज चे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांची बदली तर अकलुज चे नवे पोलिस निरीक्षक म्हणुन दीपरतन गायकवाड यांची नियुक्ती

उपसंपादक—-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
अकलूज चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची आर्थिक गुन्हे शाखा येथे बदली.झाली असुन माळशिरस चे दीपरतन गायकवाड यांची अकलूज नवे पोलीस निरीक्षक.म्हणुन नियुक्ती तर माळशिरस चे पोलिस निरीक्षक म्हणुन राजेंद्र टाकणे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी यांच्या 4मार्च रोजी बदली झाली असून, तशा सूचना सोलापूर जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी दिल्या आहेत.
माळशिरस तालुक्यातील अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक अरुण शिवदास सुगावकर यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर येथे झाली आहे.
तर माळशिरस येथील पोलीस निरीक्षक दीपरतन गोरख गायकवाड यांची बदली अकलूज पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून झाली आहे. तर सोलापूर येथील नियंत्रण कक्ष येथील राजेंद्र रंगनाथ टाकणे यांची माळशिरस पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे.
तर मंदिर सुरक्षा पंढरपूर येथील गोपाळ बासु पवार यांची बदली कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून झाली आहे.सोलापूर येथील नियंत्रण कक्ष येथीलसंतोष दत्तात्रय गिरीगोसावी यांची बार्शी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
अकलूज चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस मित्र संघटनेच्या मदतीने अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले. कायदा व सुव्यवस्था राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करून अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील 32गावात सुव्यवस्था अबाधित ठेवली.गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी दैदिय्यमान कामगिरी केली आहे.
तसेच माळशिरस पोलीस ठाणे येथील दीपरतन गायकवाड यांनी देखील माळशिरस येथे अतिशय चांगली कामगिरी केली आहे. अनेक गुन्हे उघडकीस आणून आरोपीना जेरबंद केले. तसेच इतरही अनेक विधायक कामे केली आहेत.



