बहुजन विकास आघाडी पालघर तालुका युवा अध्यक्ष श्री. कामनिष संजय राऊत यांची नियुक्ती

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत
बहुजन विकास आघाडी पालघर तालुका युवा अध्यक्ष पदी श्री.कामनिष संजय राऊत यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती बहुजन विकास आघाडी पक्षप्रमुख आमदार हितेंद्रजी ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, प्रथम महापौर राजीव नाना पाटील, आमदार राजेश पाटील यांच्या आदेशान्वये श्री. कामनिष संजय राऊत यांचे पालघर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वाढते वर्चस्व तसेच पालघर तालुक्यातील युवा तरुणांनी कामनीष राऊत यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडी मध्ये घेतलेला पक्ष प्रवेश

तसेच डिसेंबर 2022 रोजी पालघर तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांपैकी मांडे विठ्ठलवाडी, कांद्रेभुरे,खार्डी दातीवरे, सफाळे उंबरपाडा, सफाळे कर्दळ या ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली या सर्वांची दखल घेऊन पक्षश्रेष्ठीने शनिवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी श्री.कामनिष संजय राऊत यांची पालघर तालुका युवा अध्यक्ष पदी म्हणून निवड केली आहे.

सफाळे मांडे येथील श्री. कामनिष राऊत हे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी संजय राऊत यांचे सुपुत्र आहेत. याआधी पालघर तालुका बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष म्हणून श्री.महेंद्र राजपूत कार्यरत होते. त्यांच्या जागी आता नव्याने श्री.कामनिष संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




