शहर

वसई मांडवी वनरक्षक रणजीत डोळे 20000 रुपयांची लाच स्वीकारताना पालघर पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या जाळ्यात अटक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

वन विभागाकडून भूमिहीन आदिवासींना वाटप करण्यात आलेल्या जमिनीपैकी सहा गुंठे जमीन नावावर करून देण्यासाठी व त्या जागेवर बांधकाम करताना वनविभागाची कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी वनविभाग वनरक्षक वसई मांडवी रणजीत डोळे यांना शनिवारी संध्याकाळी अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप यांच्या टीमने रंगेहात अटक करून या वनरक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

वन विभागाकडून एका भूमिहीन आदिवासी बांधवाला सहा गुंठे जमीन देण्यात आलेली आहे ही जमिनी विक्री करून देऊन त्या जमिनीवर बांधकामास परवानगी देण्यासाठी व वनविभागाची कारवाई न करण्यासाठी (43) वर्षीय तक्रारदार यांच्याकडे वनविभाग वसई मांडवी वनरक्षक रणजीत दिनकर डोळे वय वर्ष (26) यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली म्हणून तक्रारदार यांनी या वनरक्षकाची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग यांच्या कार्यालयात केली होती

या तक्रारीची पडताळणी करून अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक श्री.सुनील लोखंडे( ठाणे परिक्षेत्र) व अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनिल घेरडीकर (ठाणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलीस हवालदार अमित चव्हाण,विलास भोये,संजय सुतार, नवनाथ भगत, दीपक सुमडा योगेश धारणे, महिला पोलीस हवालदार निशा मांजरेकर, पोलीस शिपाई जितेंद्र उमतोल, सखाराम दोडे या टीमने शनिवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी दुपारी पावणेचार वाजता सापळा रसून वनरक्षक रणजीत डोळे यांना तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करून या वनरक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button