करमाळा अर्बन बँकेने ठेवीदारांचे पैसे न तात्काळ दिल्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कार्यालयासमोर ठेवीदारासह आंदोलन करणार -प्रा रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा अर्बन बँकेचे ठेवीदारांचे पैसे न तात्काळ दिल्यास चेअरमन यांच्या घरासमोर ठेवीदार आंदोलन करणार असल्याचे प्रा. रामदास झोळसर यांनी सांगितले.करमाळा अर्बन बँकेचे ठेवीधाराचे पैसे मिळत नसल्याने चेअरमन प्रशासक संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत पुढे बोलतांना ते म्हणाले की
म्हणाले की करमाळा अर्बन बँक व्यापाऱ्याची बँक सर्वसामान्य नागरिकांची विश्वास संपादन केलेली बॅंक म्हणून ओळखली जाते. करमाळा भूषण स्व. गिरधरदास देवी यांनी करमाळा शहराचे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकाचे जीवनमान उंचावे त्यांना आर्थिक बचतीची सवय लागावी त्यांना उद्योग व्यवसायासाठी भांडवल याबरोबरच सर्वसामान्य लोकांना ठेवीच्या माध्यमातून महिन्याला रक्कम मिळावी या हेतूने ही बँक सुरू करण्यात आली .
सर्वसामान्य नागरिक नोकरदार शेतकरी महिला यांना आपली वाटणारी जिव्हाळ्याची बँक म्हणून अर्बन बँकेने नावलौकिक मिळावला करमाळा शहर व तालूक्यातील नागरिकांनी ठेवी देऊन बॅकेस नावलौकिक मिळवुन दिला.मात्र काही कालावधीनंतर अर्बन बँक एकदमच अडचणीत आली .नुसती अडचणीत आली नाही तर ठेवेदारीचे टीव्ही देण्यासाठीही बँकेकडे आर्थिक निर्बंधामुळे परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. त्यामुळे सर्व ठेवीदार हातबल झाले असून पै पै पैसे जमा करून जमा केलेला ठेवा अचानक कोणीतरी पळवून न्यावा.उपासमारीची पाळी यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .
तर बऱ्याच ठेवीदारांचे रोजच्या जगण्या मारण्याचा प्रश्न ठेवी अडकल्यामुळे निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व ठेवीदार यांनी मिळून प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब यांना भेटून अर्बन बँकेच्या चेअरमन संचालक मंडळ व्यवस्थापनाची चर्चा केली होती.पण शब्द देऊन धोका देत आहात .आता ठेवीदारांचा अंत पाहू नका तुम्ही जर ठेवी दिल्या नाही तर आम्ही टोकाचे पाऊल उचलू असे त्यांना सांगितले मात्र दोन फेब्रुवारी तारीख उलटूनही ठेवीदाऱ्याचे पैसे देण्याचे काम न केल्यामुळे तत्कालीन चेअरमन कन्हैयालाल देवी सर्व संचालक मंडळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढून अर्बन बँकेतील गोरगरीब शेतकरी छोटे व्यवसाय नोकरदार ज्येष्ठ नागरिक महिला यांची आयुष्याची पुंजी ठेवीची रक्कम त्यांना देण्यात यावी अन्यथा याविरुद्ध मोठे जनआंदोलन उभारून चेअरमन व संचालक मंडळाला धडा शिकवल्याशिवाय ठेवीदार गप्प बसणार नाही असा इशारा प्रा. रामदास झोळ सर यांनी दिला आहे.



