शहर

सफाळे येथील विळंगी ते आगरवाडी रस्ता दुरुस्त करावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन पुकारले जाईल… पालघर मनसे पदाधिकाऱ्यांचा इशारा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर सफाळे भागातील विळंगी ते आगरवाडी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याला खड्डे पडून अनेक ठिकाणी हा रस्ता तुटल्यामुळे दगडांचे व धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

यामुळे शाळकरी मुलांसह या भागातील नागरिकांना व वाहतूकदारांना रोज वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही वाहतूक करताना अपघात होऊन जीवित हानी होऊ नये या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता ए.आर.भांगरे यांच्या कार्यालयात जाऊन संविधानिक मार्गाने संताप व्यक्त करून व निवेदन पत्र देऊन विळंगी ते आगरवाडी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे.

ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा ही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हा सचिव गणेश गवई, पालघर तालुका अध्यक्ष तथा केळवा रोड सरपंच संदीप किणी, पालघर उपतालुका अध्यक्ष तथा उपसरपंच विळंगी चेतन किणी, पालघर शहर अध्यक्ष सुनील राऊत, पालघर उपतालुका अध्यक्ष रोहिदास भगत, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष उदय अधिकारी, तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य मयूर राऊत, पालघर शहर उपाध्यक्ष कुणाल कुंटे शहर उपाध्यक्ष निखिल पामाळे या पदाधिकाऱ्यांसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button